scorecardresearch

Premium

एक्स गर्लफ्रेंड साराला पाहून कार्तिकने केले असे काही, व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा आणि कार्तिक आर्यन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

kartik aryan, sara ali khan, kartik aryan and sara ali khan video, kartik aryan ex girlfriend, sara ali khan boyfriend, कार्तिक आर्यन, सारा अली खान, कार्तिक आर्यन व्हिडीओ, सारा अली खान एक्स बॉयफ्रेंड, कार्तिक आर्यन गर्लफ्रेंड
काही वर्षांपूर्वी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या डेटिंगच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा आपल्या खासगी आयुष्यामुळेही कार्तिकच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते. काही वर्षांपूर्वी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या डेटिंगच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. दोघांनी एकत्र काम केलं होतं. पण नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं. दोघांनी अर्थातच यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा ब्रेकअपनंतर दोघंही अचानक एकमेकांच्या समोर आले तेव्हा जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान नुकतेच एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जेव्हा कार्तिकनं साराला या कार्यक्रमात पाहिलं तेव्हा त्यानं जे केलं फारच कौतुकास्पद होतं. मागचे सगळे वाद आणि भांडण विसरून कार्तिकनं साराची गळाभेट घेतली एवढंच नाही तर तिच्यासोबत त्यानं कॅमेऱ्याला पोज देखील दिली. सारा देखील त्याच्यासोबत हसून बोलताना दिसली. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीचं नातं मात्र आजही कायम असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

foreigner guy making kanda poha viral video
Video : वाह! फॉरेनर दाखवतोय महाराष्ट्रीयन ‘कांदे-पोहे’ रेसिपी! “आम्हाला मुलगा पसंत आहे!” म्हणाले नेटकरी
Customer orders 1 fish fry Zomato responds with Paani mein gayi Zomato shared the post on social media platform X
जेव्हा झोमॅटोही ‘छपाक’ खेळ खेळतो तेव्हा…; ग्राहकाने ‘फिश फ्राय’ मागवताच, म्हणाले, “पानी में गई”; Chat व्हायरल
cards
रिझर्व्ह बँकेने कार्ड नेटवर्कवर निर्बंध का घातले? तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर…
mumbai girl made Pink Biryani for Barbie theme party
Mumbai : गुलाबी बिर्याणी! मुंबईच्या तरुणीने बार्बी थीम पार्टीसाठी चक्क बनवली गुलाबी रंगाची बिर्याणी; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, VIDEO व्हायरल

आणखी वाचा- हृतिक रोशनवर कोसळला दुखःचा डोंगर, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन

कार्तिक आणि साराच्या जोडीला पसंत करणारे त्यांचे चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. दोघंही पुन्हा एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा #Sartik ट्रेंड होताना दिसत आहे. दरम्यान ‘लव्ह आजकल २’ चित्रपटाच्या वेळी सारा आणि कार्तिक यांच्या नात्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. पण नंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आणि त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं समोर आलं. या चित्रपटानंतर दोघंही कुठेही एकत्र दिसले नाहीत.

आणखी वाचा- शिल्पा शेट्टी स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात? म्हणाली “माझं त्याच्यावर…”

दरम्यान सध्या कार्तिक आर्यनबद्दल बोलायचं तर त्याचं नाव अभिनेत्री कृती सेनॉनशी जोडलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. या कार्यक्रमातही कृती आणि कार्तिक एकत्र दिसले होते. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा असल्या तरी दोघांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kartik aryan and sara ali khan video goes viral when they meet after breakup mrj

First published on: 17-06-2022 at 15:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×