रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी सध्या चर्चेत आहे. जिकडे पाहावे तिकडे रणबीर आलियाच्याच चर्चा आहेत. कधी त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशामुळे, तर कधी त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यामुळे त्यांचे नाव सगळ्यांच्या बोलण्यात येते. सध्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या निमित्ताने ते विविध शहरांना भेटी देत आहेत. यादरम्यान एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले.

आणखी वाचा : इंदिरा गांधींशी स्वतःची तुलना करत कंगना रणौतने व्यक्त केली मनातली भीती, म्हणाली…

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, जेव्हा रणबीरला त्याच्या लग्नानंतरच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की, “मी खूप स्वतंत्र आहे आणि कोणावरही अवलंबून नाही याचा मला खूप अभिमान वाटत होता. पण मी नकळत आलियावर खूप अवलंबून आहे हे मला janavl. आलिया कुठे आहे याची माहिती नसली तर मी बाथरूमला जाऊ शकत नाही किंवा जेवू शकत नाही. आलिया माझ्याबरोबर आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. एकत्र असल्यावर जरी आम्ही आपापल्या कामात व्यग्र असलो किंवा काहीही रोमँटिक बोलर नसलो तरी ती माझ्या आजूबाजूला आहे ही भावना माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.”

पुढे, तू आणि आलिया शिव आणि ईशासारखेच एकमेकांशिवाय अपूर्ण आहात का?, असे त्याला विचारले असता तो आलियाशिवाय अपूर्ण आहे, पण त्याची आणि आलियाची तुलना शिव आणि ईशाशी होऊ शकत नाही, असे तो म्हणाला. रणबीरने सांगितले, “शिवा आणि ईशा ही चित्रपटातील पात्रे आहेत, प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या आयुष्यातही चांगले आणि वाईट दिवस येतात, पण सतत स्वत:ला सुधारण्याची आणि एकमेकांसाठी आपले बेस्ट व्हर्जन बनवण्याची इच्छा आमची इच्छा कधीही बदलत नाही. आमचे नाते खूप रोमँटिक आहे आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आहोत असे नाही. प्रेम हे प्रत्येकजण करत असतो, पण तो एक संघर्ष आहे, नातेसंबंध कठीण असतात आणि ते नातं छान टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागते.”

हेही वाचा : सोशल मीडियावर सुरु आहे ‘ब्रह्मास्त्र’च्या मीम्सचा पाऊस, फोटो बघून तुम्हालाही अनावर होईल हसू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर अनेक मुलाखतींमध्ये आलियाचे कौतुक करताना दिसतो. त्यांची जोडी ऑफस्क्रीन लोकप्रिय आहेच, त्यासोबत त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ चांगलाच सुपरहीट झाला असून प्रेक्षक ही जोडी पुन्हा पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.