दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडल यांनी देखील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रानू मंडल रोतोरात स्टार झाल्या होत्या. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता त्यांचा श्रीवल्ली या गाण्यावार डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चित्रपटातील पुष्पा प्रमाणे लूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हातात काठी असल्याचे दिसत आहे. सध्या रानू मंडल यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Video: अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या श्रेयस तळपदेचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावरील डान्स व्हायरल

कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने त्याच्या चित्रपटामध्ये रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली. मात्र, नंतर रानू या इंटस्ट्रीमधून गायब झाल्या. आता रानू यांचा अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.