scorecardresearch

Premium

रणवीर- दीपिकाच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई

दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा इटलीत २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

ranveer deepika
दीपिका-रणबीर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची. दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा इटलीत २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या लग्न समारंभाला दोघांच्याही कुटुंबातले मोजकेत तीस जण उपस्थित असणार अशी माहिती आहे. दीप- वीरने आपल्या लग्नाबाबत पुरेपूर गोपनियता बाळगली असून हा सोहळा अत्यंत खासगी व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठीच त्यांच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना मोबाईलसुद्धा नेण्यास बंदी आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नसोहळ्याला मोबाईल आणू नये, अशी आग्रहाची विनंती दीपिका आणि रणवीरने पाहुण्यांना केली आहे. लग्नविधीचा एकही फोटो व्हायरल होऊ नये, अशी त्या दोघांचीही इच्छा आहे. अनुष्का- विराटच्या लग्नातही उपस्थित असलेल्यांनी लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. अलीकडे सोनमच्या लग्नातही हेच झाल्याचं पाहायला मिळालं. यातूनच धडा घेत रणवीर- दीपिकाने पाहुण्यांना मोबाईल न आणण्याची विनंती केली आहे.

pune drug peddler lalit patil, lalit patil escaped from police custody, pune divisional commissioner saurabh rao
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; विभागीय आयुक्त राव यांचे आश्वासन
guardian minister dada bhuse expressed office Registration Stamp Department help citizens provided quality services
नोंदणी मुद्रांक विभागाद्वारे आता दर्जेदार सेवा; पालकमंत्री दादा भुसे यांना विश्वास
2 thousand notes meme
दोन हजाराच्या नोटा बदलून घेतल्या का? राहिला फक्त आठवडा, ३० सप्टेंबरनंतर या नोटांचं काय होणार?
sansad
मोठी बातमी! संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणती विधेयके येणार? सरकारने जाहीर केली यादी!

Happy Birthday Saif Ali Khan : ‘या’ अटीवर करिनाने सैफशी बांधली लग्नगाठ

२० नोव्हेंबर रोजी इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्यातील हे सुरेख क्षण अविस्मरणीय व्हावे आणि त्याचे खासगीपण जपले जावे, हा दोघांचाही प्रयत्न आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranveer singh and deepika padukone guests not allowed to bring mobile phones at their wedding

First published on: 16-08-2018 at 11:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×