अभिनेता रणवीर सिंह आपल्या चित्रपट आणि हटके स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असतो. नुकतंच ६ जुलै रोजी बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीरने आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने त्याने स्वतःला जगातली फास्टेस्ट कार गिफ्ट केलीय. त्यामूळे कालच्या वाढदिवसानंतर रणवीर आज पुन्हा आपल्या कोट्यावधीच्या कारमुळे चर्चेत आलाय. तसंच रणवीरच्या कारची किंमत ऐकून त्याचे सगळे चाहते थक्क झाले आहेत.
बॉलिवूडचा बाजीराव म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रणवीर सिंह फक्त सिनेमांवर नाही तर प्रत्येक चाहत्याच्या मनात राज्य करतो. त्याच्यासारखं दुसरं कोणीही नाही हे तो वेळोवेळी दाखवून देतो. कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या रणवीरकडे तितक्याच कोट्यवधी किंमतीच्या लक्झरी गाड्यांचा ताफाही आहे. त्याच्या या ताफ्यात काही दिवसांपूर्वी लँबोर्गिनी उरुसची कार चमकत होती. त्यानंतर आता त्याच्या कारच्या ताफ्यात आणखी एक जगातली फास्टेस्ट कार सामील झाली आहे. ‘मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६००’ ही महागडी कार रणवीरने त्याच्या वाढदिवसाला स्वतःलाच गिफ्ट केली आहे. गेल्याच महिन्यात भारतात लॉंच झालेल्या या कारची किंमत तब्बल ३ कोटी इतकी आहे. भारतातील सर्वात महागडी ही कार आहे. या कारसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. यात तो कारच्या बाजुला उभा असलेला दिसून येत आहे.
मर्सिडीज बेन्झचे डिलर ऑटो हॅंगर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रणवीरचा हा कारसोबतचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “ऑटो हॅंगरकडून बॉलिवूडचा चार्म रणवीर सिंहला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…त्याची नवी कार मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६०० साठी त्याचं अभिनंदन सुद्धा…”
View this post on Instagram
अभिनेता रणवीर सिंहने गेल्या मे महिन्यातच लँबोर्गिनी उरुसचे पर्ल कॅप्सूल एडिशन खरेदी केले होते. रणवीरने या कारसाठी ४.५ कोटी रुपये मोजले होते. लँबोर्गिनी ऊरसची एक्स शोरुम किंमत ३.१५ कोटी रुपये आहे. याच्या पर्ल कॅप्सूल एडिशनसाठी किंमतीच्या २० टक्के अधिक शुल्क द्यावे लागते.
रणवीरने नुकतीच घेतलेल्या मर्सिडीज मेबॅक जीएल एस ६०० या कारबद्दल सांगायचं झालं तर ही कार स्टॅंडर्ड व्हर्जनच्या तुलनेत कित्येक पटीने प्रीमियम आहे. मेबॅक जीएल एस ६०० मध्ये वुडन इंसर्ट, नापा लेदर, 12.3 इंचचे डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, 12.3 इंचचे इन्फोटेनमेंट सिस्टम एमबीयूएक्स इंटरफेस सोबतच हॅंडराइटिंग रिकग्निशन आणि जेस्चर कंट्रोल, इलेक्ट्रिकली-ओपनिंग पॅनोरमिक स्लाइडिंग आणि एक अपारदर्शी रोलर ब्लाइण्ड सोबत सनरूफ देण्यात आले आहे. याशिवाय या कारमध्ये क्लायमेट कंट्रोल सोबत मसाज फंक्शनदेखील देण्यात आले आहे.