बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपट मागच्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अभिनेता शाहरुख खानचं बरंच कौतुक केलं होतं. शाहरुख खानमुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं जगभरात नाव घेतलं जात असल्याचं एका मुलाखतीत रणवीरनं म्हटलं होतं. मागच्या ३ वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात न दिसलेला शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून बॉलिवूड पुनरागमन करत आहे. ज्यात रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे.

रणवीर सिंग अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला, “शाहरुखला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. तो या इंडस्ट्रीला पुढे घेऊन जाणार यात अजिबात शंका नाही. त्यामुळेच तो बॉलिवूडचा किंग आहे. शाहरुखने अभिनयाचा मॉल उभा केला आणि आम्ही तर त्यात स्वतःची छोटी- मोठी दुकानं चालवतोय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री शालिनी पांडेय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय आगामी काळात त्याच्याकडे बरेच चित्रपट आहेत. तर शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये झिरो चित्रपटात दिसला होता. आगामी काळात त्याचा ‘पठाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्यात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.