रुपेरी पडद्यावर रोमॅण्टिक भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंग ख-या आयुष्यातही तितकाच रोमॅण्टिक आहे. दीपिकावर असलेले त्याचे प्रेम त्याच्या वक्तव्यातून वेळोवेळी दिसून येते. पण दीपिका अजूनही रणवीरवर ‘छुपछुपके’ प्रेम करताना दिसते, असो. नुकताच या दोघांचा ‘बाजीराव-मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगली पसंती दिली. तरीही रणवीरला आपल्या आईने हा चित्रपट पाहू नये असे वाटते होते.
याविषयी बोलताना रणवीर म्हणाला की, ‘लुटेरा’, ‘गुंडे’, राम लीला आणि आताचा ‘बाजीराव मस्तानी’.. या चित्रपटांच्या शेवटी मी मरतो. त्यामुळेच माझ्या आईने बाजीराव मस्तानी पाहावा असे मला वाटत नव्हते. पण तिने मला खूप आग्रह केला आणि शेवटी ती तिच्या मैत्रीणींसह चित्रपट बघायला गेली. त्यानंतर ती खूप दुःखी झाली होती. चित्रपटात मी मेलो हे तिला अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे माझ्या पुढच्या चित्रपटात मी अखेरपर्यंत जीवंत राहिन अशी अपेक्षा करतो. रणवीरचे सध्या जे चित्रपट आले त्यात तो शेवटी मरतानाच दिसला आहे. साहजिकच कोणतीही आई अशी दृश्ये पाहून भावनिक होणार.
याचसोबत बॉलीवूडच्या या बाजीरावला म्हणजेच रणवीरला दीपिकासोबतच्या दोन्ही चित्रपटांत ‘हॅप्पी एन्डींग’ न झाल्याचेही दुःख वाटते. यावर रणवीर म्हणाला की, हे खरचं खूप वाईट आहे. दीपिकोसोबतच्या चित्रपटात मला शेवटपर्यंत जगायचंय आणि आम्ही सुंदर आयुष्य जगतोय असा शेवट मला हवाय. दीपिकासोबतच्या चित्रपटात मी मरतानाच चित्रीत करण्यात आलेले आहे.
बघू, आता पुढे कधी या बॉलीवूड लव्हबर्ड्सनी एकत्र चित्रपट केला तर त्यांना ‘हॅप्पी एन्डिंग’ मिळेल अशी अपेक्षा करुया.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2016 रोजी प्रकाशित
रणवीरला दीपिकासोबत हवाय ‘हॅप्पी एन्डींग’
दीपिकावर असलेले त्याचे प्रेम त्याच्या वक्तव्यातून वेळोवेळी दिसून येते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 05-01-2016 at 11:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh wants to see a happy ending with deepika padukone