बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच रणवीरचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही असे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपने वक्तव्य केल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला होता. त्यानंतर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट असा वाद सुरु झाला. आता त्यावर आता रणवीर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीरने ‘इंडिया टुडे’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी हिंदी भाषेवर सुरु असलेल्या वादावर रणवीरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. “आमिर खानचे चित्रपट चीनमध्ये चांगली कमाई करतात, ज्याची अपेक्षा कोणी कधी केली असेल असं नाही. हे सगळं चित्रपटाच्या पटकथेवर अवलंबून आहे. सिनेमा आणि खेळात सर्व प्रकारच्या सीमारेखा ओलांडण्याची ताकद आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंतावा’ हे गाणं ऐकल्यानंतर मी आनंदाने वेडा होता”, असे रणवीर म्हणाला.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

आणखी वाचा : “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल

आणखी वाचा : “बॉलिवूडला मी परवडणार नाही”, वादानंतर महेश बाबूने दिले स्पष्टीकरण म्हणाला…

पुढे रणवीर म्हणाला, “मला वाटतं की एखादी पटकथा ही भाषेच्या या सगळ्या सीमा ओलांडणारी असली पाहिजे. जर तुम्ही ‘पॅरासाइट’ चित्रपट पाहिला तर त्याने या सगळ्या सीमा ओलांडल्या, ऑस्कर पुरस्कार जिंकले आणि तो सबटायटल केलेला चित्रपट होता. हा चित्रपट एका कोरियन दिग्दर्शकाने बनवला आणि तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. चित्रपटाच्या कथानकाला आता सीमेचे बंधन राहिलेले नाही. मी ‘नार्कोस’ हा शो पाहिला नसला तरी त्याच्या लोकप्रियता मला माहितीये. ‘मनी हाइस्ट’सुद्धा स्पॅनिश, कोरियन भाषेत आहे, तरी देखील संपूर्ण जगात लोक ही सीरिज पाहत आहेत.”

आणखी वाचा : बॉलिवूडला मी परवडणार नाही म्हणणाऱ्या महेश बाबूचे आलिशान घर पाहिलेत का?

रणवीर पुढे म्हणाला, “मी ‘पुष्पा’ पाहिला, मला तो आवडला. मी ‘KGF’ भाग १ पाहिला आहे, मी अजून भाग २ पाहिला नाही, मी तो पाहण्यासाठी खूप उस्तुक आहे. मला ‘KGF’ भाग १ आवडला, हे लोक जे काम करतात त्याचा मी मोठा चाहता आहे…अल्लू अर्जुन, रॉकिंग स्टार यश. ‘RRR’ थिएटरमध्ये पाहण्याचा योग आला आणि तो चित्रपट खूप चांगला होता. मला आनंद आहे की ते इतकं चांगलं काम करत आहेत आणि आता त्यांना जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

Live Updates