Rasha Thadani Steals From Mother Raveena Tandon’s Wardrobe : बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते. रवीनाप्रमाणेच तिची मुलगी राशादेखील खूप सुंदर आहे. राशाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे आणि चाहते आता तिच्या पुढच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत राशाने खुलासा केला की ती तिच्या आईच्या कपाटातून वस्तू चोरायची.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राशाने तिच्या फॅशन सेन्सबद्दल सांगितलं आणि एक खुलासा केला. तिने सांगितलं की, ती तिच्या आईच्या कपाटातून वस्तू चोरायची. तिने खुलासा केला की तिला केप्रीज आवडत नाही आणि तिच्यासाठी आराम हा सर्वात महत्त्वाचा आहे. राशा म्हणाली की, तुम्हाला जे काही सोयीस्कर वाटत नाही ते स्पष्टपणे दिसून येते, म्हणून तुम्ही जे काही परिधान करता त्यात आत्मविश्वास बाळगा.

राशा रवीनाच्या कपाटातून ‘या’ गोष्टी चोरायची

राशाने खुलासा केला की, ती तिची आई रवीना टंडनच्या कपाटातून ९० च्या दशकातील सनग्लासेस आणि बेल्ट चोरायची. राशा तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे आणि ती वारंवार सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करते. लोकांना आई-मुलीची ही जोडी खूप आवडते.

राशाने अमन देवगणबरोबर ‘आझाद’ या चित्रपटातून पदार्पण केले, जो या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट चांगला चालला नाही, तरी त्यातील गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. राशाकडे सध्या काही चित्रपट आहेत. ती लवकरच अभय वर्मा बरोबर ‘लाइकी लाईका’ चित्रपटात दिसणार आहे, जो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

राशाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाने लोक खूप प्रभावित झाले होते. राशाची तिच्या आई रवीना टंडनप्रमाणेच अभिनयात करिअर करण्याची इच्छा आहे आणि तिला तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा आहे.