‘नॅशनल क्रश’ अशी ओळख असलेली रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटामध्ये तिने काम केले होते. या चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. तिच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. ती ‘मिशन मजनु’ आणि ‘अ‍ॅनिमल’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही झळणार आहे. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्यसुद्धा सतत चर्चेत असते. ती सध्या विजय देवरकोंडाला डेट करत आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रश्मिका सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमाद्वारे ती चाहत्यांशी संवाद साधत असते. रश्मिका काही वेळेस खासगी आयुष्यातील अपडेट्स त्यांना देत असते. नुकताच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रश्मिकाने ट्रोलिंगचा अनुभव सांगितला आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “गेले काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षांपासून मला काही गोष्टी त्रास देत आहेत. या गोष्टींवर लक्ष देण्याचे मी आज ठरवले आहे. ज्याबद्दल मी खूप आधी बोलायला हवं होतं, त्यावर मी आज व्यक्त होणार आहे.”

आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”

ती पुढे म्हणाली, “कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी ट्रोल्सचा सामना करत आहे. ट्रोलर्ससाठी मी पंचिंग बॅग बनले आहे. मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यासाठी खूप काही गमवावं लागणार आहे हे मला आधीपासूनच ठाऊक होते. मी सर्वांना आवडेन असे नाही आणि मी कोणाकडून तशी अपेक्षाही करत नाही. पण कारण नसताना तुम्ही माझ्याबद्दल द्वेष पसरवू शकत नाही. जेव्हा इंटरनेटवर मला विनाकारण ट्रोल केलं जातं, तेव्हा त्याचा मला खूप मनस्ताप होतो.”

आणखी वाचा – ‘चाहत्याशी गप्पा मारल्या, त्याच्याच मुलाला कडेवर घेतलं’, बॉलिवूडच्या ‘या ‘अभिनेत्याचं होतंय सर्वत्र कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या मुलाखतींचा चुकीचा अर्थ काढला जातो. खोट्या अफवा पसरवल्या जातात. याने मला आणि माझ्या जवळच्यांना खूप त्रास होतो. मी चुकत असेनही, चुका सुधारायची माझी तयारी आहे. पण द्वेष पसरवणं वाईट आहे. खूप वर्षांपासून दुर्लक्ष केलेल्या या मुद्द्यावर व्यक्त व्हायचे मी आज ठरवले”, असे म्हणत तिने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. या प्रवासामध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दल तिने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.