भारतीय चित्रपट ज्यांच्या नावानेच सुरू होतो ते म्हणजे महान दिग्दर्शक सत्यजित रे होय. सिनेमाला जमिनीशी जोडणारी, मानवी भावभावना व जगण्याची नितांत सुंदर नक्षी रुपेरी पडद्यावर चितारणारे असे किमयागार सत्यजित रे यांच्या कहाण्या घेऊन नेटफ्लिक्सने ‘रे’ या एंथोलॉजी सीरिजची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. येत्या २५ जून रोजी ही सीरिज रिलीज होणार असून आज या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून त्यांनी हा ट्रेलर रिलीज केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “उत्तम कलाकार, उत्कृष्ठ दिग्दर्शक आणि महान लेखकाची एक वेगळी कहाणी…हे सत्यात उतरताना पाहण्यासाठी तयार व्हा येत्या २५ जूनला.” या ट्रेलरमध्ये सुरवातीला महान दिग्दर्शक सत्यजित रे यांचं रेखाचित्रं दाखण्यात आलं असून ‘हंड्रेड ईअर्स ऑफ रे’ असं लिहिलंय. या सीरिजमध्ये झळकणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयी आणि हर्षवर्धन कपूर यांचा फर्स्ट लूक देखील दाखवण्यात आलाय. या सीरिजमध्ये सत्यजित रे यांच्यावर एकूण चार टप्प्यांमध्ये कहाण्या दाखवण्यात येणार आहेत. या चारही कहाण्याचे टायटल सुद्धा या ट्रेलरमध्ये सांगितले आहेत. ‘फरगेट मी नॉट’, ‘हंगामा है क्यू बरपा’, ‘बहुरूपिया’ आणि ‘स्पॉटलाइट’ अशी चार नावं या वेगवेगळ्या कहाण्यांना देण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

या सीरिजचं दिग्दर्शन अभिषेक चौबे, श्रीजीत मुखर्जी, वासन बाला यांनी केलंय. तर अभिनेता मनोज वाजपेयी, गजराज राव, अली फजेल, श्वेता बसु प्रसाद, अनिंदिता बोस, के के मेनन, बिदिता बाग, दिब्येंदु भट्टाचार्य, हर्षवर्धन कपूर, राधिका मदान, चंदन रॉय सान्याल, आकांक्षा रंजन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून सोशल मीडियावर हा ट्रेलर अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. नेटफ्लिक्सने हा ट्रेलर त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही तासांत दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स मिळाले आहेत.

या सीरिजमध्ये महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या दाखवण्यात येणाऱ्या चार कहाण्या या प्रेम, वासना, विश्वासघात आणि सत्यता यावर आधारित आहे. सत्यजित रे हे एक दिग्दर्शक तर होतेच, पण त्यांनी लेखक, निर्माता, कार्टूनिस्ट, कॅलिग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि चित्रपट समीक्षक म्हणून देखील आपल्या भूमिका बजावल्या आहेत. ६० च्या दशकात राजकीय विचारसरणीच्या निकषांवर रेंच्या मांडणीतील अपुरेपणावर चर्चा झडत राहिली होती. त्यामूळे सत्यजित रे यांच्या प्रत्येक भूमिकांमधील कमतरता आणि विविध पैलू या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत.