‘परिणीता’ चित्रपटाने विद्या बालनला इंडस्ट्रीत एक नवीन ओळख मिळवून दिली. तर दुसरीकडे, या चित्रपटाने संगीतकार शंतनू मोईत्रा यांच्या कारकिर्दीची सुरुवातही केली. आता या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होत आहेत आणि चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार वेगवेगळे किस्से सांगत आहेत. असाच एक किस्सा बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांच्याशी संबंधित आहे.

त्याबरोबरच या चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनाही शंतनूने श्रद्धांजली वाहिली आहे. एका नवीन मुलाखतीत शंतनूने चित्रपटाच्या चित्रीकरणाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. त्यांनी ‘परिणीती’चा भाग असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली. ‘कैसी पहेली जिंदगानी’ या गाण्यात रेखा यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती.

“त्यांनी मला गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर बोलावले” : शंतनू मोईत्रा

‘रेडिओ नशा’शी बोलताना तो म्हणाला, “जेव्हा मला कळले की, रेखाजी ‘कैसी पहेली’ हे गाणे करत आहेत, तेव्हा मी खूप खूश झालो. पण, मी तुम्हाला त्याबद्दल एक गोष्ट सांगतो. मला प्रदीप सरकार यांचा फोन आला आणि त्यांनी मला गाण्याच्या शूटिंगसाठी सेटवर बोलावले; पण त्यावेळी मी इतर काही गाण्यांवर काम करत होतो म्हणून मी त्यांना सांगितले की, मी व्यग्र आहे. सरकार यांनी सांगितले की, रेखाजी यांना मला भेटायचे आहे. ते ऐकून मी थक्क झालो. ते मला त्यांच्या मेकअप रूममध्ये घेऊन गेले. त्या त्याच सेटवर एक गाणे शूट करीत होत्या, जिथे आजकाल ‘कौन बनेगा करोडपती’चे चित्रीकरण सुरू आहे. मी पहिल्यांदाच मेकअप रूममध्ये गेलो आणि आरशाभोवती लाईट बल्ब होते. मी कॅमेऱ्याकडे पाहिले, तेव्हा ती अभिनेत्री तिथे बसली होती.”

शंतनू पुढे म्हणाला, “त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि विचारले, ‘तुम्ही गाणे बनवले आहे का? ते अद्भुत आहे. माझी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही शूटिंगसाठी थांबावे, अशी माझी इच्छा आहे.” त्या माझ्याशी पहिल्यांदाच बोलल्या होत्या, मी ते कधीही विसरणार नाही. त्या अधूनमधून माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलत होत्या, जणू काही त्या ठीक चालले आहे का, असे विचारत होत्या.” दिग्दर्शकाने कष्टाने बनवलेल्या स्टोरीबोर्डचे त्यांनी कौतुक केले आणि सांगितले की, प्रत्येक शॉट आधीच डिझाइन केलेला होता.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप सरकार यांची आठवण करून देताना विद्या बालनने एका मुलाखतीत म्हटले होते की, तिचे करिअर त्यांच्यामुळेच आहे. चित्रपटांमध्ये यश मिळाल्यानंतर विद्याने त्यांच्या काही प्रोजेक्ट्सना नकार दिला. त्यानंतर असे म्हटले जाते की, तिला पटकथा आवडली नाही म्हणून तिने नकार दिला आणि त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.