मागच्या आठवड्यामध्ये ‘ब्रह्मास्त्र’ हा बिगबजेट चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त त्याने ‘रॉकेट्री’, ‘लाल सिंग चड्ढा’, ‘ट्यूबलाईट’ अशा काही चित्रपटांमध्ये कॅमिओ केला आहे. ब्रह्मास्त्रमधील शाहरुखने साकारलेले पात्र चित्रपटाच्या कथेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या कॅमिओमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काहीजणांनी ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरपेक्षा शाहरुख जास्त भाव खाऊन गेला असे म्हटले आहे. ब्रह्मास्त्रमधल्या त्याच्या कामाची चर्चा होत आहे. अशातच शाहरुख खानचे एक ट्वीट व्हायरल झाले आहे.

शाहरुखच्या मुलाने आर्यन खानने नुकतंच ‘आदिदास’ या मोठ्या कंपनीसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधले काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आर्यनने ‘NMD_V3’ हे आदिदास कंपनीचे शूज घातलेले आहेत. फोटोंच्या खाली त्याने “NMD_V3 घालून टाकलेल्या प्रत्येक पावलाने नवा मार्ग तयार होतो. स्वत:चा मार्ग तयार करा.” असे कॅप्शन दिले आहे. तसेच आर्यनने या पोस्टमध्ये आदिदास कंपनीला टॅग देखील केले आहे. या फोटोशूटमध्ये त्याने नवा लूक कॅरी केला आहे. या इन्स्टाग्राम पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये शाहरुख, गौरीसह अन्य सेलिब्रिटींनी कमेंट केले आहे.

दरम्यान गौरी खानने तिच्या लाडक्या मुलाचा या फोटोशूटमधला एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये आर्यनने ग्रे रंगाचे टी-शर्ट, त्यावर पिवळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे आदिदासचे शूज घातले आहेत. तो एका हातावर जोर देत दुसऱ्या बाजूला जाताना उडी मारत आहे. उडी मारताना हवेत असतानाचा आर्यनने फोटो गौरीने ट्वीट केला आहे. या फोटोचे ट्वीट रिशेअर करत शाहरुखने त्याच्या ‘मैं हूँ ना..’ या चित्रपटातला एक फोटो ट्वीट केला आहे. या चित्रपटातला आर्यनच्या फोटोसारखा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच शाहरुखने या दोन्ही फोटोंच्यावर “माझ्यावर गेला आहे.. माझा लाडका” असे कॅप्शन जोडलेले आहे.

आणखी वाचा – ‘ब्रह्मास्त्रच्या’ पुढील भागाबद्दल दिग्दर्शक अयान मुखर्जीचं मोठं विधान!! म्हणाला “दुसरा भाग..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी अमली पदार्थांच्या प्रकरणावरुन आर्यन खान चर्चेत आला होता. या खटल्यातून त्याची सुटका झाली आहे.