अभिनेत्री रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. परंतू तिला हा धक्का सुशांत सिंह राजपूतच्या कोणत्या केसमुळे नाही बसला. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या काकांचं करोनामुळे निधन झालंय. याची माहिती रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या काकांच्या निधनाचे दुःख व्यक्त करत त्यांच्यासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीने तिच्या इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या दिवंगत काकांचा फोटो देखील जोडलाय. त्यांचा फोटो शेअर करताना अभिनेत्री रियाने कॅप्शनमध्ये लिहिलं, ” एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन, एक सम्माननीय अधिकारी, प्रेमळ पिता आणि एक उत्तम व्यक्ती…करोनाने तुम्हाला आमच्यापासून दूर केलं…परंतू तुमच्या आठवणी कायम आमच्या मनात राहतील…सुरेश अंकल, तुम्ही एक रिअल लाइफ हिरो आहात….तुम्हाला सलाम करते सर!”.
View this post on Instagram
अभिनेत्री रियाच्या काकांचं नाव कर्नल एस. सुरेश कुमार असं आहे. त्यांच्या बद्दल बोलताना रियाने ‘रिअल लाइफ हिरो’ असं त्यांचं वर्णन केलं. अभिनेत्री रियाचे वडील सुद्धा आर्मीमध्ये कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दिवंगत कर्नल सुरेश कुमार हे कदाचित तिच्या वडिलांसोबत काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबतच रियाची जास्त जवळीक असू शकते.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती आणि कित्येक महिने ती सुशांतसोबत लिव्ह इनमध्ये होती. परंतू असं बोललं जातंय की, सुशांतच्या मृत्यूच्या दोन दिवसांपुर्वीच दोघांमध्ये भांडण झालं होतं. सुशांतच्या मृत्यूच्या तपासात सीबीआय आणि एनसीबीने ड्रग्स रॅकेटच्या प्रकरण समोर आणलं. या ड्रग्स रॅकेटमध्ये पुढे जाऊन दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह आणि अर्जुन रामपाल सारख्या बड्या स्टार्सची नावं समोर आली. या प्रकरणात अभिनेत्री रियाला देखील अटक करण्यात आली होती.