बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी अटकेत आहे. त्यानंतर या प्ररणात दररोज नव नवे खुलासे समोर येताना दिसून येत आहेत. पती राज कुंद्राच्या अटकेमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. ‘सुपर डान्सर ४’ या शो मधून तिला बाहेर काढण्यात आलं. तर दुसरीकडे तिच्या हातून बरेच मोठे ब्रॅण्ड निसटून गेले आहेत. शिल्पा शेट्टीच्या या अडचणीच्या काळात तिचं समर्थन करण्यासाठी आता अभिनेत्री रिचा चड्ढा समोर आली आहे.

रिचा चड्ढा ही बॉलिवूडमधली एक अशी अभिनेत्री आहे जी कोणत्याही मुद्द्यावर आपलं ठाम मत व्यक्त करताना जराही घाबरत नाही. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं रोखठोक मत व्यक्त करतच असते. हंसल मेहताच्या नंतर आता अभिनेत्री रिचा चड्ढाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय. नुकतंच रिचा चड्ढाने तिच्या ट्विटर अकाउंटवरवरून ट्विट शेअर करत तिला समर्थन दिलंय. बरं झालं शिल्पा शेट्टीने तक्रार केली, असं तिने या ट्विटमधून म्हटलंय.

हे देखील वाचा: “पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं

अभिनेत्री रिचा चड्ढाने यापुढे तिच्या ट्विटमध्ये लिहिलं की, “आपण हा खेळ बनवलाय की जेव्हा एखाद्या पुरूषाची चूक असते तेव्हा आपण त्याच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला प्रत्येक चूकांसाठी दोषी ठरवत असतो. बरंय शिल्पाने तक्रार केलीय.” रिचा चड्ढाच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

यापूर्वी दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टीला समर्थन दिलं होत. यात त्यांनी एक नव्हे तर तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. पहिल्या ट्वीटमध्ये हंसल मेहता म्हणाले, ” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देऊ शकतं नाही तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या. या कठिण काळात तिला शांतीत राहू द्या. ही खूपच वाईट गोष्ट आहे की जे नावाजलेले लोक आहेत त्यांना न्याय मिळण्याआधीच दोषी ठरवलं जातं.” असं हंसल मेहता ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

ह देखील वाचा: बिग बींची नात नव्या सोबतच्या नात्यावर अखेर मिजान जाफरी म्हणाला, “ती मला खूप आकर्षक वाटते”

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 29 मिडिया व्यक्ती आणि मीडिया हाऊसविरोधात अश्लील चित्रपट प्रकरणात खोटी बातमीदारी करणे आणि आपली प्रतिमा खराब केल्याबाबत, मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.