दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. नुकतंच झुंड या चित्रपटात झळकलेली रिंकू लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले आहे. सध्या या पोस्टरची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

रिंकू राजगुरुच्या या नव्या चित्रपटाचे नाव “आठवा रंग प्रेमाचा” असे आहे. चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद ही प्रसिद्ध जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरुसोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘…अन् काही क्षणात ती व्यक्ती दिसेनाशी झाली’, अभिनेता विराजस कुलकर्णीला पुण्यात झाला भुताचा भास

रिंकूने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रिंकू राजगुरु आणि विशाल आनंद हे दोघेही दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना रिंकूने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरु, ‘आठवा रंग प्रेमाचा’ १७ जून पासून चित्रपटगृहात…’, असे रिंकूने यावेळी म्हटले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन नंबर झाला लीक, विकृतांनी मेसेज फोनवर केली शरीरसुखाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर कर्णिक यांनी “क्युं हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटात आजच्या काळातील एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातील आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे.