दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट शर्माजी नमकीन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे.

‘शर्माजी नमकीन’ या चित्रपटातील सर्वात खास गोष्ट अशी आहे की, या चित्रपटात एकच भूमिका दोन दिग्गज कलाकारांनी साकारली आहे. जेव्हा ऋषी कपूर या चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे चित्रपट अर्धवट राहिला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय आणि दिग्दर्शकानं मिळून हा चित्रपट पूर्ण केला. त्यामुळेच ऋषी कपूर यांची भूमिका नंतर परेश रावल यांनी साकारली आणि उरलेला चित्रपट त्यांनी पूर्ण केला.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…

आणखी वाचा- “मला माहीत नाही हा चित्रपट…” The Kashmir Files वर हिना खानची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० रोजी निधन झालं. त्यापूर्वी त्यांनी अभिनय केलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी ‘शर्माजी नमकीन’चं दिग्दर्शन केलं आहे. येत्या ३१ मार्चला हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबतच जूही चावला, सुहैल नय्यर, तारुक रैना, सतीश कौशिक, शीबा चड्ढा, ईशा तलवार, परेश रावल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.