मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायमच आपल्या अभिनयनाने आणि विनोदाच्या उत्तम टायमिंगमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर ‘मस्ती’, ‘धमाल’, ‘एक व्हिलनसारखे’ चित्रपट त्याने केले आहेत. ‘लई भारी’ चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. नुकताच त्याच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ (Plan A Plan B) असे चित्रपटाचे नाव असून यात त्याच्याबरोबर अभिनेत्री ‘तमन्ना भाटिया’ असणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तमन्ना ही लोकांची लग्न जुळवणारी दाखवली आहे तर रितेश लग्न मोडणारा दाखवला आहे. चित्रपटात रितेश वकिलाच्या भूमिकेत आहे तर तमन्ना मॅच मेकर दाखवली आहे. हे दोघे एकमेकांच्या पडतात हे चित्रपटात दाखवले आहे. हा चित्रपट पूर्णपणे मसाला चित्रपट असणार हे नक्की. यात तुम्हाला प्रेमकहाणी, भांडण, नाट्यमयता असणार आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्याला ही जोडी बघायला मिळणार आहे.

करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून शनाया कपूरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, अभिनेते संजय कपूर यांनी दिली माहिती

तमन्ना म्हणाली की, चित्रपटात मॅचमेकर म्हणून काम करणे हा तिच्यासाठी अविस्मरणीय प्रवास’ होता. तर रितेशने ‘प्लॅन ए प्लॅन बी’ मध्ये अनेक वळणं असणार आहेत. तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे विनोदी शैलीसाठी नेहमीच सॉफ्ट कॉर्नर आहे आणि ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा माझ्यासाठी आणखी एक संस्मरणीय अनुभव होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशांक घोष हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ते असं म्हणाले की, ‘प्लॅन ए प्लॅन बी’ एक रोमँटिक कॉमेडी असणारा हलकाफुलका चित्रपट आहे. यात रितेश आणि तमन्ना व्यतिरिक्त पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला यांच्याही भूमिका आहेत. याची निर्मिती रजत अरोरा (फंक युवर ब्लूज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) आणि त्रिलोक मल्होत्रा आणि के आर हरीश (इंडिया स्टोरीज मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड) यांनी केली आहे.