बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा आज ३३वा वाढदिवस आहे. नेहा आज तिच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर नेहाचे चाहते नेहाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे नेहाचा पती रोहनप्रीतच्या पोस्टने वेधले आहे.

रोहनप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाने हिरव्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. तर रोहनप्रीतने टी-शर्ट परिधान केला आहे. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

“माझी राणी माझं प्रेम आणि द नेहा कक्कर. आज तुझा वाढदिवस आहे. या निमित्ताने मला तुला सांगायचे आहे की, मी आता पर्यंत तुझी जेवढी काळजी घेतली, त्याहुन जास्त काळजी मी येणाऱ्या काळात घेईन…प्रत्येक आरशात मला तू सुंदर दिसते. मी वचन देतो की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन…मला तुझा पती असल्याचा अभिमान आहे. मी वचन देतो की माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट मी तुझ्यावर प्रेम करेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझं प्रेम,” असे कॅप्शन देत रोहनप्रीतने तो फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!

दरम्यान, नेहा २००५ मध्ये ‘इंडियन आयडल’ची स्पर्धक होती. सध्या नेहा ही ‘इंडियन आयडल १२’ची परिक्षक आहे. गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सिंग आणि नेहाने लग्न केले. नेहा रोहनप्रीतपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे.