दाक्षिणात्य सुपरस्टार आणि आरआरआर फेम राम चरण काही दिवसांपूर्वीच बाबा झाला. राम चरणीची पत्नी उपासना कमिनेनी २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता चार दिवसांनंतर राम चरणच्या पत्नीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत राम चरण आणि त्याची पत्नी उपासना ही रुग्णालयाबाहेर उभी असल्याचे दिसत आहे. यातील एका व्हिडीओत राम चरण हा त्याच्या लेकीला घेऊन उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्याची आई सुरेखा यादेखील दिसत आहेत. तर एका फोटोत उपासना आणि राम चरण हे दोघेही बाळाबरोबर फोटो काढताना दिसत आहे. त्याबरोबरच राम चरणने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही आभार मानले आहेत.
आणखी वाचा : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम, ‘या’ पक्षात जाहीर प्रवेश
या व्हिडीओत राम चरण हा उपासना आणि बाळाला रुग्णालयाबाहेर घेऊन येताच त्याच्या चाहत्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली. यावेळी राम चरणने आपल्या लेकीची आणि पत्नी उपासनाच्या आरोग्याविषयी माहिती दिली.
दरम्यान राम-उपासनाने आपल्या गोंडस लेकीसाठी पाळण्याची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे आरआरआर गायक काला भैरव यांनी राम चरणच्या मुलीसाठी एक खास धून तयार केली आहे.
आणखी वाचा : ‘जवान’चं जपान कनेक्शन ते दिग्दर्शक अॅटलीचं मानधन; शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?
लग्नाच्या ११ वर्षानंतर झाले आई-बाबा
राम चरण आणि उपासना कमिनेनी लग्नाच्या ११ वर्षानंतर आई-बाबा झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या लेकीचे स्वागत जल्लोषात केले. राम चरणला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे समजताच चाहत्यांनी फटाके फोडले. ढोल-ताशाच्या गजरात एकत्र येऊन जल्लोष केला. तर काहींनी मोफत मिठाईचे वाटप केले.