scorecardresearch

“धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य

मी अमिताभ बच्चन राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलत नाही कारण ते माझे ज्युनियर

“धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य
फोटो सौजन्य : लोकसत्ता

अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यादेखील गेली अनेकवर्ष मालिका, चित्रपटांमधून काम करताना दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. सिनेसृष्टीत आज त्यांच्याकडे सिनियर कलाकार म्हणून बघितले जाते मात्र त्यांनी एका मुलाखतीत अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

बॉलिवूडमधील हिमॅन अशी ओळख असणारे अभिनेते म्हणजे धर्मेंद्र अर्थात सर्वांचे लाडके धरम पाजी, बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सचिन पिळगावकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर खुलासा केला आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की “इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ५४ वर्ष कार्यरत आहात इतका काळाचा अनुभव असणारा अभिनेता आहे का?”त्यावर सचिन पिळगावकर म्हणाले, “इंडस्ट्रीत ५४ वर्ष कार्यरत असणारा अभिनेता असं सांगणं थोडं कठीण आहे त्यातल्या त्यात धरमजींचं नाव घेऊ शकतो. धरमजी माझे सिनियर मी अमिताभ बच्चन राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलत नाही कारण ते माझे ज्युनियर, पण धरमजींच्याबाबतीत बोलायचं झालं तर ते माझे सिनियर आहेत.” असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी

सचिन पिळगावकर आणि धर्मेंद्र यांनी ‘झिद’, ‘शोले’, ‘क्रोधी’, यासांरख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. धर्मेंद्र यांचे ‘अनुपमा’, ‘चुपके चुपके’, ‘नया जमाना’, ‘प्रतिज्ञा’, ‘यादों की बारात’सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

धर्मेंद्र मूळचे पंजाबचे, दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनयाच्या बरोबरीने त्यांनी निर्मित क्षेत्रात पदार्पण केले होते. आपल्या निर्मितीसंस्थेतून त्यांनी बेताब निर्मिती केली . या चित्रपटातून त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सनी देओलला लाँच केले होते. त्यांचा दुसरा मुलगा बॉबी देओल हादेखोल बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 13:56 IST

संबंधित बातम्या