सध्या अभिनयसृष्टीमध्ये बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहे. दोन्हीकडील कलाकारांध्येही मागच्या काही दिवसांपासून कोल्ड वॉर सुरू असल्याचं दिसत आहे. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपटांची हिंदी व्हर्जन बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत तर दुसरीकडे बॉलिवूडकरांचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सपशेल फेल ठरल्याचं दिसून येत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरणं परखड मत व्यक्त केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड विरुद्ध साऊथ या वादावर अनेक कलाकारांनी आपली मतं मांडली आहेत. ज्यात श्रेयस तळपदे, सोनू सूद, रितेश देशमुख, कंगना रणौत अशा कलाकारांचा समावेश आहे. आता यावर सई ताम्हणकरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सई ताम्हणकरनं या वादावर आपलं मत मांडताना सर्वात आधी आपण सगळे भारतीय असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा- “त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये…” लैंगिक अत्याचारांबद्दल सांगताना ढसाढसा रडली जॉनी डेपची पत्नी

सई ताम्हणकरनं आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांध्येही काम केलं आहे. सध्या चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या वादावर बोलताना ती म्हणाली, “मला वाटतं आपण या सर्व गोष्टींमध्ये पडायला नको. कारण सर्वात आधी आपण सगळे भारतीय आहोत. आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवतो कारण आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. सर्वच भाषा आपल्या आहेत.”

आणखी वाचा- पतीसोबत रोमांस करताना दिसली सपना चौधरी, इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये भाषा वाद सर्वाधिक वाढलेला पाहायला मिळत आहे. याचं महत्त्वाचं कारण बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांना बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत अधिक यश मिळणं हे मानलं जात आहे. अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेले, ‘पुष्पा’, RRR आणि KGF 2 हे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. त्या तुलनेत ‘द कश्मीर फाइल्स’ वगळता कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवता आलेली नाही.