अभिनेत्री सई ताम्हणकर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सई चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. सईची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सईने तिचा फोटो शेअर केला नाही तर एका वेगळ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सई म्हणाली, “मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते नं..!” असे कॅप्शन तिने दिले आहे. यासोबतच सईने #one #saheb #daulatrao असे काही हॅशटॅग्ज वापरले आहेत. आता ही व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आणखी वाचा : “माझ्या पतीने माझ्या ओळखीच्या सर्व महिलांसोबत…”, अभिनेत्री मंदाना करीमीने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : “माझा धर्म परिवर्तन करून, मंदिरासमोर…”; ईराणी अभिनेत्री मंदाना करीमीने सांगितले लग्नानंतरचे धक्कादायक वास्तव

सईने हा फोटो पोस्ट केल्यानंतर “या फोटोतील व्यक्ती कोण?”, “आम्ही नक्की काय समजावे?” अशा अनेक कमेंट केल्या आहेत. यावर प्रिया बापट, वैभव तत्ववादी, सुयश टिळक आणि प्रार्थना बेहेरे यांनी देखील कमेंट केली आहे. तर प्रियाने कमेंट करत फोटोमध्ये असलेल्या त्या व्यक्तीला टॅग केले आहे.

आणखी वाचा : “हे बोलून तुम्ही दंगली घडवत आहात”, राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियाने त्या व्यक्तीला टॅग केल्यानंतर ती व्यक्ती निर्माता अनिश जोग आहे. अनिश जोग आणि सई ताम्हणकर यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. गर्लफ्रेंड, धुरळा, YZ, टाइम प्लीज अशा अनेक चित्रपटांचा निर्माता अनिश निर्माता आहे.