‘…तर तैमुर आंधळा होईल’, फोटोग्राफर्सवर सैफ भडकला

याआधीही सैफ फोटोग्राफर्सवर भडकला होता

तैमुर, सैफ

इतक्या वर्षांमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला जितकी लोकप्रियता मिळाली नसेल त्याच्या कैकपटीने त्याच्या मुलाला तैमुरला मिळत आहे. तैमुर अली खान हा समाज माध्यमांचे एकमेव आकर्षण आहे. त्यामुळे तो जिथे जाईल तिथे चाहत्याचे त्याचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत असतात. काही दिवसांपूर्वीच तैमुरला सैफ आणि करिनासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तैमुरला पाहिल्यानंतर अनेक फोटोग्राफर्स त्याचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. सैफ आणि करिना फोटोग्राफर्सना तैमुरचे फोटो काढण्यापासून कधीच अडवत नाहीत. परंतु यावेळी मात्र सैफ फोटोग्राफर्सवर भडकल्याचे दिसून आलं. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सैफ,करिना आणि तैमुर दिसून येत आहे. यावेळी तैमुर त्याच्या वडीलांच्या अर्थात सैफच्या खांद्यावर बसला होता. या तिघांना विमानतळावर पाहिल्यानंतर अनेक फोटोग्राफर्स तैमुरचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. विशेष म्हणजे सवयीप्रमाणे तैमुरनेदेखील फोटोग्राफर्सला हात दाखवत छानशी स्माइल दिली. मात्र फोटोग्राफर्सचे सर्व फोकस आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश तैमुरवर होते. हे पाहून सैफ फोटोग्राफर्सवर भडकला.

 

View this post on Instagram

 

#taimuralikhan #saifalikhan #kareenakapoorkhan off to Pataudi #airportdiaries @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

“आता फोटो काढणं बंद करा. त्या फ्लॅश आणि फोकसचा परिणाम तैमुरच्या डोळ्यांवर होईल. या फ्लॅशमुळे तैमुर आंधळा होईल”, असं म्हणत सैफने त्याचा राग व्यक्त केला. इतकचं नाही तर त्यानंतर फोटोग्राफर्सनी सैफ आणि करिनाला थांबवत त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावरदेखील सैफ संतापल्याचं दिसून आलं. “तुम्हाला फोटो काढायचे असतील तर असेच काढा. आम्ही पोज वैगरे देऊ शकत नाही”, असं तो म्हणाला.

दरम्यान, याआधीदेखील तैमुरचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर सैफ भडकला होता. तैमुर लहान असल्यामुळे आता त्याचं वय खेळण्याचं -बागडण्याचं आहे. मात्र सतत प्रसारमाध्यमे, चाहते आणि फोटो या साऱ्याची तैमुरला सवय झाली आहे. त्याच्या या सवयीमुळे त्याचं बालपण कुठेतरी मागे राहता आहे. त्यामुळे त्याला त्याचं बालपण जगता यावं यासाठी सैफने घराबाहेर उभ्या राहणाऱ्या फोटोग्राफर्स आणि चाहत्यांना तैमुरचे फोटो न काढण्याची विनंती केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Saif ali khan gets angry on paparazzi for clicking taimur ali khan picture