Saiyaara box office collection day 1 : जेव्हा एखादा नवीन चित्रपट येतो तेव्हा लोक त्याच्या कमाईचा अंदाज आधीच लावू लागतात. विशेषतः जेव्हा नवीन चित्रपटाबरोबर स्टारकास्टदेखील नवीन असते; पण खरा स्टार तोच असतो, जो पहिल्याच चेंडूवर षटकार मारतो.

अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर ‘सैयारा’नेही असेच काम केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाल्या. ही एक प्रेमकथा होती, जी वेगळी नसली तरी खास ठरली.

आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्या दिवसाची कमाईही समोर आली आहे. तेव्हा आकडे पाहता, प्रत्येकाला प्रेमाची भाषा समजते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

‘सैयारा’चा मुख्य अभिनेता अहान हा इंडस्ट्रीत नवीन आहे; पण त्याच्या पहिल्याच चित्रपटाने त्याने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या वर्षीच्या काही चित्रपटांना मागे टाकले आहे. सनी देओलपासून ते आमिर खानपर्यंत आणि अक्षय कुमारपासून ते अजय देवगण व राजकुमार रावपर्यंत, अहानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी त्यांना मागे टाकले आहे.

‘सैयारा’ चित्रपटाची एकूण कमाई किती?

‘सैयारा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी हे सिद्ध केले आहे की, प्रेमाची ताकद कधीही कमी होत नाही. ’सॅकनिल्क’च्या ताज्या अहवालानुसार, अहान आणि अनितच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २० कोटींची कमाई केली आहे. जरी हे फक्त सुरुवातीचे आकडे असले तरी ते आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट ७०-७५ कोटी सहज कमाई करील, अशी अपेक्षा आहे. शनिवार आणि रविवारच्या सुटीचा पूर्ण फायदा या चित्रपटाला मिळू शकतो.

अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर ‘सैयारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा सरप्राईज ठरला. अजय देवगणच्या ‘रेड २’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १९.२५ कोटी रुपये कमावले. सनी देओलच्या ‘जाट’ने पहिल्या दिवशी फक्त ९.६२ कोटी रुपये कमावले. त्याच वेळी, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ११.५० कोटी रुपये कमावले. अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ने पहिल्या दिवशी १२.२५ कोटींचा व्यवसाय केला. अक्षयच्या ‘केसरी चॅप्टर २’ बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ७.७५ कोटी रुपये कमावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सैयारा’ हा वर्षातील चौथा सर्वांत मोठा प्रारंभिक यशस्वी चित्रपट

‘सैयारा’बरोबरच १८ जुलै रोजी इतर अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाले; पण अहान पांडेच्या प्रेमासमोर दुसरा कोणताही चित्रपट टिकू शकला नाही. हा चित्रपट मोहित सुरीच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा प्रारंभिक यश मिळवणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे. या चित्रपटाने ‘आशिकी २’ व ‘एक व्हिलन’ला मागे टाकले आहे. २०२५ च्या सर्वांत मोठ्या १० अग्रगण्य चित्रपटांमध्ये ‘सैयारा’ या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये चौथे स्थान मिळवीत, ‘जाट’, ‘सितारे जमीन पर’, ‘स्काय फोर्स’ व ‘रेड २’ या चित्रपटांना मागे टाकले आहे.