मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री सखी गोखलेला ओळखले जाते. ती कायमच चर्चेत असते. सखी गोखलेला तिच्या मनमोकळे स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. ती सोशल मीडियावर सक्रीय असते. तसेच ती विविध चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच सखी गोखलेने तिचा पती अभिनेता सुव्रत जोशीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची ओळख मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून आहे. सखी आणि सुव्रत कायमच एकमेकांसाठी पोस्ट शेअर करत असतात. त्या दोघांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतंच सखी गोखलेने सुव्रतसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष

सखीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे आणि सुव्रतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुव्रत आणि सखीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. “मला निवडल्याबद्दल धन्यवाद आणि दररोज तुला निवडण्याची संधी मला दिल्याबद्दल तुझे धन्यवाद.” असे तिने यात म्हटले आहे.

हेही वाचा : “आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सखीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांच्या चाहत्यांनीही यावर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केल्या आहेत. सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर झाली. ११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.