गेल्या काही वर्षात संगीत क्षेत्रात वेगवेगळे सांगितिक प्रयोग होताना दिसत आहेत. तसेच लाइव्ह कॉन्सर्ट होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अनेक मोठमोठे गायक त्यांच्या गाण्यांचे लाइव्ह कार्यक्रम करत असतात. अशा कार्यक्रमांना प्रेक्षकही मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र लाइव्ह कॉन्सर्टला प्रत्येकवेळी गायक गाणे गातात की मागून रेकॉर्ड लावलेली असते, असा प्रश्न अनेकदा उपास्थित केला जातो. आता यावर गायक, संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलील कुलकर्णी यांनीही आतापर्यंत गाण्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्यासोबत त्यांनी केलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम प्रेक्षकवर्गात प्रचंड लोकप्रिय आहे. सलील कुलकर्णी नेहमीच त्यांची मतं सोशल मीडियावर स्पष्टपणे मांडताना दितात. आता अशाच लाईव्ह गाण्यांच्या शोजवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “हे माझे क्रश…”; स्पृहा जोशीने पोस्ट केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सध्या सलील कुलकर्णी यांची एक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांनी लाइव्ह कॉन्सर्ट आणि लाइव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली प्रेक्षकांची केली जाणारी फसवणूक यावर त्यांचं मत मांडलं आहे. सलील कुलकर्णी यांनी लिहिलं, “लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर करून रेकॉर्ड लावून लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी निघून कॅब करण्यासारखं आहे. सगळ्यांचीच फसवणूक…” यासोबतच त्यांनी निरीक्षणे हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हेही वाचा : “माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी…”, गायक सलील कुलकर्णींनी सांगितली त्यांच्या आजोबांची खास आठवण

या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी त्यांच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. एका नेटकऱ्याने लिहिलं, “हिंदीमध्ये असे प्रकार सर्रास होतात.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कटू सत्य.” आणखीन एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “आम्ही तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहोत.” तर काहींनी त्यांना आलेले असे अनुभवही कमेंट्स करत शेअर केले आहेत. सलील कुलकर्णी यांची ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saleel kulkarni shared his views about lip sync in live concerts rnv
First published on: 09-11-2022 at 12:18 IST