बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या हळदीचे आणि संगीत कार्यक्रमातील काही फोटो कतरिना आणि विकीने शेअर केले होते. दरम्यान, त्यातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत रणबीर कपूर दिसत आहे. या फोटोत रणबीर विक्कीकडे रागात पाहत असल्याचे दिसत आहे.

विकी आणि कतरिनाच्या मेहंदीच्या कार्यक्रमातले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातलाच हा एक फोटो आहे. या फोटोत कतरिना आणि विकी नाचताना दिसत आहेत. तर या फोटोत एका बाजुला रणबीर दिसत आहे. रणबीरने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर तो रागात विकीकडे पाहत आहे. तर याच फोटोत दुसऱ्या बाजुला सलमान दिसत आहे. सलमान कतरिनाकडे पाहत आहे. मात्र, त्या दोघांनी विकी आणि कतरिनाच्या लग्नात हजेरी लावली नव्हती. हा त्यांचा एडिट केलेला फोटो आहे.

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विकी आणि कतरिना १० डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून केले.