बॉलिवूडचा बजरंगी भाईजान ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या २६ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री महिमा मकवाना ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि महिमा यांच्यात काही इंटिमेट आणि रोमँटिक दृश्य चित्रित करण्यात आले आहे.

मात्र यातील रोमँटिक दृश्य करताना आयुष शर्मा हा फार गोंधळला होता. त्याने स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे. नुकतंच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्याला होने लगा या महिमासोबतच्या गाण्याबद्दल, त्यातील रोमँटिक दृश्यांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आला आहे. यावेळी त्याने मी हे शूट करताना फार अस्वस्थ झालो होतो, असे तो म्हणाला.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष शर्माने सांगितले की, “हे गाणे शूट करत असताना माझ्या मनात हजारो गोष्टी सुरु होत्या. मला सतत माझी पत्नी अर्पिता आणि माझ्या मुलांचे विचार मनात येत होते. कोणतेही इंटिमेट सीन करताना मी फार अस्वस्थ आणि नर्व्हस झालो होतो. मला फार चांगले आठवतं, जेव्हा आम्ही ‘होने लगा’ गाण्याचे शूटिंग करत होतो तेव्हा मी फार वेडा झालो होतो. माझ्या मनात फक्त असा विचार होता की ते ऑनस्क्रीन काहीही दाखवत नाही. हे सर्व माझी पत्नी पाहत नाही. माझी मुले काही बघत आहेत का? मला पुढे काय होणार हे माहिती नव्हते. माझ्या मनात हजारो विचार येत होते,” असेही त्याने सांगितले.

यापुढे आयुष म्हणाला की, “चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शूटींगदरम्यान माझ्यासोबत एक प्रँकही केला होता. या प्रँकमुळे मी चकित झालो होतो. एके दिवशी महेश मांजेरकर यांनी मला फोन केला आणि मला सांगितले की या चित्रपटात किसिंग सीनची गरज आहे. पण त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी किसिंग सीन करु शकत नाही,” असे म्हटले.

पण त्यावेळी त्यांनी चित्रपटात तो सीन गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मी त्यांना विनंती केली, “सर मी तुम्हाला विनंती करतो पण कृपया तुम्ही माझ्यासोबत असे करु नका. हा एक गँगस्टर चित्रपट आहे. त्यामुळे यात एखाद्या लव्हस्टोरी असू शकत नाही. असे सांगत मी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मी लहान मुलासारखा महिमाकडेही गेलो आणि तिला सांगितले की तूही त्यांना सांग मी असे सीन करण्यास अस्वस्थ आहे,” असे त्याने सांगितले.

‘अंतिम’ : सलमान खान आणि आयुष शर्माच्या चित्रपटातील आयटम सॉन्ग ‘चिंगारी’ प्रदर्शित!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अंतिम’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. तर सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रेक्षक या चित्रपटातीची प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.