Video : मध्यरात्री लूलिया वंतूरसोबत सलमानची सायकल राइड

सलमानला सायकलिंग करायला प्रचंड आवडतं

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान सध्या भारत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपलं राज्य कायम केलं आहे. त्यामुळे सध्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या सलमानवर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यातच आता सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान त्याची तथाकथित प्रेयसी लूलिया वंतूरसोबत रात्री सायकल राइड करताना दिसून आला.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान लूलियासोबत मंगळवारी (११ जून) रात्री २.३० वाजता सायकल राइड करत होता. यावेळी त्यांच्यासोबत मलायका-अरबाजचा मुलगा अरहान खानदेखील असल्याचं पाहायला मिळालं. मात्र काही वेळातच तो पुन्हा गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये परतल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, सलमानला रस्त्यावर सायकलिंग करायला आवडतं हे साऱ्यांनीच पाहिलं आहे. अनेक वेळा त्याला मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालविताना पाहण्यात आलं आहे. सध्या सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड सुरु असून या चित्रपटाने ७ दिवसांमध्ये १६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan cycles on mumbai streets with iulia vantur and arhaan khan ssj

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या