बॉलिवूड अभिनेता सलमान खान अलिकडेच अभिनेत्री पूजा हेगडे आणि काही इतर कलाकारांसोबत दुबई येथे त्याच्या Da-Bang टूरसाठी गेला होता. यावेळी सलमाननं डान्स परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी त्याच्यासोबत पूजा हेगडे सुद्धा होती. सलमान आणि पूजानं सुपरहिट गाणं ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर धम्माल डान्स केला मात्र डान्स करताना सलमानकडून एक चूक झाली. सलमानच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सलमान खान आणि पूजा हेगडे यांनी ‘जुम्मे की रात’ या सुपरहिट गाण्यावर डान्स परफॉर्मन्स दिला. पण पूजासोबत डान्स करत असतानाच सलमान स्वतःच्याच गाण्याच्या हूक स्टेप विसरून गेला. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. पण सर्वात मजेदार गोष्ट अशी की, डान्स स्टेप विसरल्यानंतर सलमान थांबला नाही. त्यानं स्वतःच्याच अंदाजात डान्स करायला सुरुवात केली.

आणखी वाचा- FACT CHECK: सलमानने सोनाक्षी सिन्हाशी केले गुपचुप लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे सत्य

स्वतःच्याच गाण्याच्या हुक स्टेप विसरल्यानंतर सलमाननं जे केलं ते पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर सलमानचे चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. तर काही युजर्स मात्र सलमान खानच्या डान्सची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जुम्मे की रात’ हे गाणं सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटातील आहे. ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसली होती. हे गाणं सलमान आणि जॅकलिन यांच्यावर चित्रत करण्यात आलं असून यात तो जॅकलिनचा ड्रेस तोंडात पकडून डान्स करताना दिसला आहे. यावेळी त्यानं पूजासोबत अशाप्रकारे डान्स करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक तो स्वतःचा डान्स विसरून गेला.