बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच सलमानने त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, सलमानला कोणत्या सेलिब्रिटीने काय गिफ्ट दिलं आहे याची एक यादी समोर आली आहे. या यादीत जॅकलिन फर्नांडिसपासून शिल्पा शेट्टी पर्यंत अनेकांची नावं आहेत.

सलमानने त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी कतरिनाने त्याला २ ते ३ लाख रुपयांचं सोन्याचं ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आहे. तर जॅकलिनने १० ते १ लाख रुपयांचं घड्याळ गिफ्ट केलं आहे. शिल्पाने १६ ते १७ लाख रुपयांचं डायमंड ब्रेसलेट गिफ्ट केलं आहे. अनिल कपूरने सलमानला २७ ते २९ लाख रुपयांचं लेदर जॅकेटं दिलं आहे. संजय दत्तने ७ ते ८ लाख रुपयांचं डायमंडचं ब्रेसलेट दिलं आहे.

आणखी वाचा : साराने केले गुपचूप लग्न? अखेर व्हायरल फोटोमागील सत्य आले समोर

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमानच्या कुटुंबामध्ये बहिण अर्पिताने १५ ते १७ लाख रुपयांचं रोलेक्सचं घड्याळ गिफ्ट केलं आहे. भाऊ सोहेल खान आणि अरबाज खानने २३ ते २५ लाख रुपयांची बीएमडब्ल्यूची गाडी आणि २ ते ३ कोटी रुपयांची ऑडी आरएस क्यू8 गाडी भेट म्हणून दिली आहे, असे अनेक गिफ्ट सलमानला त्याच्या वाढदिवशी मिळाले आहेत.