बिग बॉसचे १६वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. या पर्वासाठी सलमान खानने किती मानधन घेतलं, याबद्दल विविध अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, अशातच बिग बॉसच्या नवीन पर्वाच्या लाँचच्या वेळी, सलमानने स्वतःच त्याच्या मानधनाबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामुळे सर्व अफवांना विराम मिळाला आहे.

ताजिकिस्तानचा ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा

मंगळवारी या शोची पत्रकार परिषद झाली. यादरम्यान अभिनेत्याला तुला खरंच फी म्हणून एक हजार कोटी रुपये मिळतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सलमान म्हणाला, ‘इतकं मानधन मला आयुष्यात कधीच मिळणार नाही. इतकं मिळालं तर मी कधीच काम करणार नाही. माझ्याकडे वकील आणि इतर खर्च खूप आहे. अशा अफवांची इन्कम टॅक्स विभागाचे लोक दखल घेतात आणि मला भेटायला येतात.’

“माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा

सलमान खान बिग बॉस १६ होस्ट करणार नसल्याचीही माहिती मध्यंतरी आली होती. त्यावरही सलमानने भाष्य केलं. तो म्हणाला, ‘मी कधीकधी कंटाळतो, त्यामुळे लोकांना सांगतो की मी हा शो करणार नाही. पण असेच लोक मला शो करण्यास भाग पाडतात. मी नाही तर दुसरं कोण होस्ट करणार? निर्मात्यांकडे कोणताही पर्याय नाही, त्यामुळे ते माझ्याकडे येतात. त्यांच्याकडे कोणताही पर्याय असता तर ते माझ्याकडे कधीच आले नसते.”

टीव्हीवरील ‘या’ दोन लोकप्रिय सूना बिग बॉसमध्ये दिसणार? समोर आली महत्वाची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत सलमान खानने सोळाव्या पर्वातील पहिल्या सदस्याची ओळख करुन दिली. या स्पर्धकाचे नाव ‘अब्दू रोजिक’ असे आहे. तो मुळचा ताजिकिस्तानचा आहे. अठरा वर्षांचा अब्दू गायक आहे. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तो सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.