बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या आगामी टायगर ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अद्यापही तो हँडसम हक म्हणूनच ओळखला जातो. सलमानचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि त्यात मुलींची संख्या ही जास्त आहे. सलमान खान कधी लग्न करणार? हा जणू काही जागतिक प्रश्नच झाला आहे. त्याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आले. मात्र अद्याप सलमानने कधीही प्रेमाची किंवा लग्नाची कबुली दिलेली नाही. मात्र नुकतंच सलमान खानने एक व्हिडीओ शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सलमान खानने नुकतंच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या त्याल त्याच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील ‘प्रेम’ हा त्याला त्याच्या भविष्याबद्दल विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात सलमान ‘प्रेम’च्या घरी पोहोचण्यापासून होते. यावेळी प्रेम हा सलमानची बॉडी पाहून फारच प्रभावित होतो. त्यावेळी तो त्याला विचारतो, ‘भविष्यातही माझी बॉडी सेम’, त्यावर सलमान म्हणतो ‘हो’. त्यानंतर प्रेम चाहता वर्गाबद्दल विचारतो. त्यावरही सलमान होकारार्थी मान डोलावतो.
यानंतर ‘प्रेम’ त्याला लग्नाबद्दल विचारतो. त्यावर सलमान म्हणतो, “लग्न झाले…पण तुझ्या सर्व गर्लफ्रेंडचे”. यावर प्रेम म्हणतो याचा अर्थ ‘भविष्यातही सर्व तसेच आहे’. सलमानचा हा व्हिडीओ एका जाहिरातीचा आहे. यात सलमान हा ‘पेप्सी’ या कोल्ड्रिंक्सची जाहिरात करताना दिसत आहे. सलमानचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि सोनाक्षीचा लग्न झाल्याचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हाने सडेतोड उत्तर दिले होते. तुम्ही इतके मूर्ख आहात का की तुम्हाला खरा आणि एडिट केलेला फोटो यातील फरक समजू नये, असे सोनाक्षी म्हणाली होती.
“हॅलो मित्रा…”; ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापला अभिषेक बच्चन
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ यांच्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ‘टायगर ३’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिल २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे.
‘टायगर ३’ यात सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.