बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे चाहते नेहमीच वाट पाहत असतात. सलमान वर्षभरात अनेक चित्रपट करत नसला तरी दरवर्षी एखाद्या ठराविक सणाच्या दिवशी त्याचा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होतो. यंदाही अशाचप्रकारे सलमानचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राधे’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. सलमानने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सलमानने नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘अंतिम’ चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. यात सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. सलमानने हे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Actor Ritesh Deshmukh believes that the amount of OTT is to some extent on the stress of financial success
आर्थिक यशाच्या ताणावर ‘ओटीटी’ची मात्रा काही प्रमाणात लागू; अभिनेता रितेश देशमुखचे मत
Akshay Kumar
“माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर बॉलीवूडमधील काही लोक…”, अक्षय कुमारने सांगितला फिल्म इंडस्ट्रीतील अनुभव
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
Ranbir kapoor
‘या’ कारणामुळे रणबीर कपूरचे चित्रपट होतात ब्लॉकबस्टर; प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून खुलासा
Anant Ambani Radhika Murchant Varun Grovar
“राजेशाही अराजकता निर्माण करते”, अनंत अंबानींच्या लग्नावरून लेखक वरूण ग्रोव्हर यांची जळजळीत टीका
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी
dharmaveer 2 movie poster launch prasad oak shared first look
‘धर्मवीर २’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली! ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’, सिनेमाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

“झी आणि पुनित गोएंका यांच्यासोबतचे आमचे नाते अद्भुत आहे. आम्ही ‘रेस 3’, ‘लवयात्री’, ‘भारत’, ‘दबंग 3’, ‘कागज’ आणि ‘राधे’ असे अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. यानंतर आता आम्ही ‘अंतिम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे. तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल, अशी मला आशा आहे,” असे कॅप्शन सलमानने या मोशन पोस्टरला दिले आहे.

हेही वाचा – Antim Poster : आरारारारारा खतरनाक…! सलमान खानच्या ‘अंतिम’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.