scorecardresearch

‘सलमान खानलाही जमलं नाही ते बहीण अर्पितानं करून दाखवलं!’ सोशल मीडियावर होतंय कौतुक

ईद पार्टीनंतर अर्पिता खानचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे.

salman khan, salman khan sister, arpita khan, deepika padukone, karan johar, kangana ranaut, arpita khan eid party, सलमान खान, सलमान खान बहीण, अर्पिता खान, दीपिका पदुकोन, करण जोहर, कंगना रणौत, अर्पिता खान ईद पार्टी
सलमान खाननं यंदा ईद सेलिब्रेशन स्वतःच्या नाही तर बहीण अर्पिताच्या घरी केलं.

सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरीही बॉलिवूड सेलिब्रेटींशी तिची मैत्री कोणापासून लपून राहिलेली नाही. अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी असल्यानं तिनं बॉलिवूड सेलिब्रेटींशी खूपच चांगलं बॉन्डिंग आहे. याची झलक अर्पिता खाननं अलिकडेच दिलेल्या ईद पार्टीमध्ये पाहायला मिळाली. या पार्टीमध्ये काही गोष्टी अशा देखील घडल्या ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. जे प्रसिद्ध अभिनेता असून सलमान खानला जमलं नाही ते अर्पितानं या पार्टीमध्ये करून दाखवलं.

सलमान खाननं यंदा ईद सेलिब्रेशन स्वतःच्या नाही तर बहीण अर्पिताच्या घरी केलं. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना बोलण्यात आलं होतं. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का त्यावेळी बसला. जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोन अर्पिता खानच्या ईद पार्टीमध्ये दिसली. कारण याआधी दीपिका ना सलमानच्या कोणत्या चित्रपटात दिसली आहे, ना तिने त्याच्या कोणत्या पार्टीला हजेरी लावली होती. एवढंच नाही तर कोणत्याही बॉलिवूड इव्हेंटमध्ये सहभागी न होणाऱ्या कंगना रणौतची या पार्टीमधील हजेरी देखील सर्वांसाठीच धक्कादायक होती.

आणखी वाचा- Anek Trailer Release: “इंडिया इंडिया इंडिया… ” आयुष्मानच्या बहुचर्चित ‘अनेक’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

कंगना रणौतचं दीपिका पदुकोन आणि करण जोहर यांच्याशी असलेलं कोल्ड वॉर आता कोणापासून लपून राहिलेलं नाही. कंगना सोशल मीडियावरून दीपिका आणि करण यांच्यावर हल्लाबोल करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अनेकदा त्यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचंही पाहायला मिळालं आहे. अशात हे तीनही सेलिब्रेटी एका पार्टीमध्ये एकत्र हजेरी लावणं सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का देणारं होतं. त्यामुळे आतापर्यंत या सेलिब्रेटींना एकत्र आणण्याची जी गोष्ट सलमानला जमली नाही ती अर्पितानं करून दाखवल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- करण जोहरसोबतच्या वादावर कार्तिक आर्यननं पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला…

सोशल मीडियावर या ईद पार्टीनंतर अर्पिता खानचं विशेष कौतुक होताना दिसत आहे. सलमान खानचा कोणाशीही पंगा असला असला तरीही अर्पिताचं मात्र बॉलिवूडमधील सर्वच सेलिब्रेटींशी चांगलं बॉन्डिंग आहे असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे प्रियांका चोप्रा आणि अर्पिता खानची मैत्री. प्रियांकानं सलमानसोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानं दोघांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा होत्या अर्थात दोघांनी यावर स्पष्ट मत कधीच मांडलं नाही मात्र अर्पिता आणि प्रियांकामध्ये आजही चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan sister arpita khan invite deepika padukone karan johar and kangana ranaut at eid party mrj