घटस्फोटानंतर दोन महिन्यांनी समांथाने दिले सडेतोड उत्तर, “माझ्या आयुष्यात असं काहीतरी…”

लॉकडाउनदरम्यान मी मेडिटेशन करायला सुरुवात केली,” असेही ते म्हणाली.

samantha-ruth-prabhu (1)

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अशी ओळख असलेल्या अभिनेत्री समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. घटस्फोटाची बातमी सांगितल्यानंतर समांथाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. अनेकदा यावर दुर्लक्ष केल्यानंतर अखेर समांथाने यावर मौन सोडले आहे.

समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. सामंथाचे विवाहबाह्य संबंध आहेत, कधी तिच्यावर गर्भपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यानंतर नुकतच एका मुलाखतीदरम्यान तिने या आरोपांबद्दल सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच घटस्फोटानंतर होणाऱ्या दु:खाबद्दल तिने भाष्यही केले आहे.

समांथा म्हणाली की, “मी एकही अट नसताना स्विकारण्याची मागणी करत नाही. मी अनेकदा लोकांना विविध मतं मांडण्यास प्रोत्साहन देते. पण तरीही त्यांनी एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगावी, असे मला वाटते. त्यामुळे मी फक्त विनंती करेन की त्यांनी आपली निराशा अतिशय सभ्य पद्धतीने व्यक्त करावी.”

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

“माझ्यासोबत जे काही घडलं त्याची मला फार आधीच कल्पना आली होती. माझ्या आयुष्यात असं काहीतरी होणार आहे, मला याबाबतची अगोदरच जाणीव झाली होती. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी अचानक कायमस्वरूपी बदलतात. पण या सर्व गोष्टी सहन करून माझी वाटचाल अशीच सुरू ठेवण्यासाठी मला देवाने पुरेशी ताकद दिली आहे असं मला वाटतं. लॉकडाउनदरम्यान मी मेडिटेशन करायला सुरुवात केली,” असेही ते म्हणाली.

दरम्यान २००९ मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या सेटवर समांथा व नागा चैतन्यची पहिली भेट झाली. त्यावेळी नागा चैतन्य कमल हासन यांची मुलगी श्रुती हसनला डेट करत होता. तर दुसरीकडे समांथा व ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्यमध्ये चांगलीच मैत्री झाली.

हेही वाचा : VIDEO: सेक्स की फूड?; समांथाने दिलेल्या उत्तराने उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

२०१५ मध्ये ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा हे दोघं पुन्हा भेटले तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समांथा व नागा चैतन्य एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samantha akkineni talks about acceptance after split with naga chaitanya nrp

ताज्या बातम्या