दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री समांथाचे लाखो चाहते आहेत. ती दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाने स्वतःला चित्रपटसृष्टीत सिद्ध केलंय. त्यामुळेच इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. ती टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. दरम्यान, समांथा लहानपणापासून खूप हुशार आहे. होय, आपल्या स्टाइल व अभिनयाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेली समांथा शाळेतही खूप हुशार होती.

हेही वाचा – “खेल खतम, पैसा हजम?”, ब्लू टिकवरून अमिताभ बच्चन यांची ट्विटरवर टीका; म्हणाले, “मी पैसे भरले अन्…”

समांथाची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तिचे गुण पाहिल्यावर तुमचाही विश्वास बसेल की ती खरंच अभ्यासात खूप हुशार विद्यार्थिनी होती. सामंथाची दहावीची मार्कशीट याआधीही इंटरनेटवर व्हायरल झाली होती. एकदा तर तिने स्वतःच ती रिट्विट केली होती. आता पुन्हा एकदा मार्कशीट व्हायरल होत आहे. तिला दहावीत १००० पैकी ८८७ गुण मिळाले होते. तिला गणितात १०० पैकी १००, भौतिकशास्त्रात १०० पैकी ९५ गुण, इंग्रजीमध्ये ९०, वनस्पतीशास्त्रात ८४, इतिहासात ९१ आणि भूगोलात ८३ गुण आणि तमिळ भाषेत ८८ गुण मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती आणि ती शाळेत पहिली आली होती. यापूर्वी तिची मार्कशीट व्हायरल झाल्यानंतर तिने रिट्विट करत आनंद व्यक्त केला होता. अशातच आता पुन्हा एकदा समांथाचे दहावीतील गुण चर्चेत आहेत. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच समांथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाने फार चांगली कामगिरी केली नाही. चित्रपट फ्लॉप झाला, मात्र समांथाच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.