साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभु अखेर विभक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून समांथा आणि नागा चैतन्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. दोघंही विभक्त होणार असं वृत्त होतं. अखेर या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय. समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय. या बातमीने चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

समांथा आणि नागा चैतन्यने त्यांच्या पोस्टमध्ये खूप विचार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. तसंच या कठीण काळात चाहत्यांनी, माध्यमांनी आणि हितचिंतकांनी साथ द्यावी अशी विनंती त्यांनी केलीय. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्याने गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. मात्र अवघ्या चार वर्षात दोघं विभक्त होत आहेत. साउथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून ते ओळखले जायचे. समांथा आणि नागा चैतन्याची लव्हस्टोरी देखील खास होती.

क्रिती सेनॉनच्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल, टू पीस बिकिनी परिधान करण्यास दिला नकार

समांथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट

२००९ सालामध्ये ‘ये माया चेसवे’ या सिनेमाच्या सेटवर समांथा आणि नागा चैतन्यची पहिली भेट झाली. या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली होती आणि सिनेमा हिटदेखील ठरला होता. या सिनेमावेळी दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र यावेळी दोघंही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. नागा चैतन्य यावेळी श्रुती हसनला डेट करत होता. तर समांथा सिद्धार्थला. मात्र कालांतराने दोघांचं ब्रेकअप झालं. दरम्यान पाच वर्ष दोघांमध्ये मैत्रीचं नातं टिकून होतं. २०१४ सालामध्ये सुर्या सिनेमात दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. यावेळी मात्र त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील तेव्हा दोघांचे फोटो व्हायरल होवू लागले होते. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. २०१५ सालामध्ये नागा चैतन्यला समांथाने सोशल मीडियावरून वाढदिवसानिमित्ताने क्यूट मेसेज लिहित शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याच्या चर्चांना अधिक रंग चढला. ट्वीट करत तिने लिहिलं होतं, “माझ्या कायमच आवडत्या असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे एक उत्तम वर्ष असणार आहे.” असं ती ट्वीटमध्ये म्हणाली होती. ट्विटरवरून दोघं फ्लर्ट करत असल्याचं यावेळी निदर्शनास आलं होतं.

असं केलं होतं प्रपोज

तर नागा चैतन्यने २०१६ सालामध्ये एका रोमॅण्टिक ट्रिपवर समांथाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तसचं याच वर्षी त्यांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. नागा चैतन्यने सर्वात आधी वडिलांना म्हणजेच नागार्जुन यांना त्याच्या आणि समांथाच्या नात्याबद्दल सांगितलं होतं.


२०१७मध्ये थाटामाटात लग्न

२०१७ सालामध्ये समांथा आणि नागा चैतन्यने गोव्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. ६ ऑक्टोबर २०१७ ला त्यांनी हिंदू प्रथेप्रमाणे लग्न केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट! पोस्ट शेअर करत समांथाने दिली माहिती


४०दिवस हनीमून

समांथा आणि नागा चैतन्याच्या लग्नाएवढीच चर्चा त्यांच्या हनीमूनची झाली. तब्बल ४० दिवस त्यांनी हनीमून एन्जॉय केलं. लग्नानंतर संपूर्ण जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचं त्यांनी ठरवलं होतं.

दरम्यान या क्यूट कपलच्या विभक्त होण्याने त्यांच्या चाहत्यांना दु:ख आहे. समांथा आणि नागा चैतन्याच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी समांथाच्या करियरमुळे दोघांमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.