गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनी चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर तिने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा’ चित्रपटात एक खास गाणे गायले आहे. त्यासोबत तिने या चित्रपटातील एका आयटम साँग ‘उ अंतावा उ उ अंतावा’मध्येही काम केले आहे. यात तिच्या डान्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे.

सध्या समांथाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. यात समांथा ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या खास गाण्यावरील नृत्याचा सराव करताना दिसत आहे. या डान्ससाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या डान्ससाठीच्या स्टेप्स, लिरिक्स हे सर्व लक्षात ठेवताना ती किती थकली आहे हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओत समांथा स्वत: याबाबत तक्रार करताना दिसत आहे. ‘मला कोरिओग्राफरने किती वाईटरित्या दमवले आहे’, असे ती यात सांगताना पाहायला मिळत आहे. मात्र तरीही ती तिच्या डान्सिंग स्टेप्स अगदी परफेक्ट करताना दिसत आहे.

उर्वशी रौतेलापेक्षा तिची आई आहे जास्त ग्लॅमरस, स्टायलिश फोटोंची सर्वत्र चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समांथाचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पुष्मा हा चित्रपट तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड अशा ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.