दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण सध्या समांथा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळे समांथा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

समांथाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. समांथाचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधला आहे. या व्हिडीओत समांथाने हिरव्या आणि काळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता. अनेकांना समांथाचा हा लूक आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी समांथाला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतच्या ‘या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल

आणखी वाचा : Lock Upp : ट्रान्सवूमन सायशा शिंदे ‘या’ स्पर्धकाच्या प्रेमात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “जे कपडे वरती परिधान करायला हवे होते तर ते खाली झाडू लावतं आहेत.” दुसरा नेटकरी म्हणाला, “असं वाटतं की घरातून घाई घाईत निघण्याच्या चक्करमध्ये बेडरूमची चादर गुंडाळून आली.” तिसरा नेटकरी म्हणाला, “माझ्या घरच परदा मिळाला”, अशा अनेक कमेंट करत समांथाला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.