दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागाचैतन्य हे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा आणि नागाचैतन्य यांनी काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांनी वेगळं होत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. या दोघांनी घटस्फोट का घेतला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र घटस्फोटानंतर काही महिन्यांनी समांथाने पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे.

समांथा ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. समांथाने नागाचैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर आता त्याला इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. त्यामुळे तिला नागाचैतन्यसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यामुळे ते दोघेही पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

त्यासोबतच समांथाने नागाचैतन्यसोबत शेअर केलेले सर्व फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावरुन हटवले आहेत. समांथाने हे पाऊल उचलल्यानंतर आता अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर समांथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली, “कधीकधी तुमच्यातील शक्ती पाहण्यासाठी मोठ्या अग्नीची काहीही आवश्यकता नसते. काहीवेळा एक छोटीशी ठिणगीही यासाठी पुरेशी असते. ती फार शांततेत काम करते. तुम्ही हे चालू ठेवा, तुम्हाला हे समजले असेल.” त्यासोबत तिने #MyMommaSaid हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यापूर्वी समांथाने नागाचैतन्यला लग्नातील साडीही परत केली होती.

दरम्यान समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. त्यानंतर ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँगमुळे ती चर्चेत आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.