दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे पुष्पा चित्रपटातल्या आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. आता तर समांथा सहकलाकार राम चरणसोबत दिलेल्या तिच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आली आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगस्थलम’ या चित्रपटात राम चरण आणि समांथामध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आला होता. हा चर्चेचा विषय ठरला होता. समांथाने आता त्या किस मागचं सत्य सांगितलं आहे.
सुकुमार दिग्दर्शित रंगस्थलम या चित्रपटात लग्न झालं असताना. राम चरणसोबतच्या लिप लॉक सीनसाठी समंथाला खूप ट्रोल करण्यात आले होते. यावर आता समांथाने वक्तव्यं केलं आहे. खरं तर हा किसिंग सीन नसून व्हीएफएक्स पराक्रम होता. खरं तर, सुरुवातीला जेव्हा रंगस्थलच्या दिग्दर्शकाने समांथा आणि रामला किसिंग सीनची कल्पना दिली तेव्हा दोघांनीही ते करण्यास साफ नकार दिला आणि ते काढून टाकण्याचा आग्रह धरला. त्यादरम्यान राम चरण देखील टेन्शनमध्ये होता की, त्यांची पत्नी उपासना कामिनेनी असे सीन बघेल तर तिची यावर काय प्रतिक्रिया असेल. मात्र, सुकुमारने हा सीन शूट करण्यासाठी कलाकारांवर वारंवार आग्रह केला पण दोघांनीही नकार दिला.
आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!
समांथा आणि राम चरणच्या लिप लॉक सीनला नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी व्हीएफएक्सच्या मदतीने हा सीन शूट केला. यामध्ये राम चरण आणि समांथा एकमेकांच्या जवळ येऊन किस करतात. पण ते किस करत नाहीत. हे काम व्हीएफएक्सच्या मदतीने करण्यात आले. या सीनमध्ये फक्त गालाला स्पर्श होता, लिप लॉक नव्हता, असं समांथा म्हणाली होती. मात्र, प्रेक्षकांच्या मनात हेच राहिलं की समांथाने खरंच हे केलं.
आणखी वाचा : तैमूरच्या फोटोवर कंगनाची कमेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले…
समांथा पुढे म्हणाली, ‘मला माहित आहे की लोक शिवीगाळ करत होते की मी माझ्या लग्नानंतर असे सीन कसे करू शकते. जर विवाहित सुपरस्टार्सने असे केले तर तुम्ही त्यांना हाच प्रश्न विचाराल का? कारण मी मुलगी आहे? माझे कुटुंब मला खूप सपोर्ट करते, विशेषत: माझे सासरे, ज्यांनी द्वेष करणाऱ्यांची चेष्टा केली आणि त्यामुळे मी सेटवर आरामात काम करू शकले. ‘फॅमिली मॅन २’ ही वेबसीरिज पण आहे. या वेब सीरिजमध्ये समांथाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत जे अक्किनेनी कुटुंबाला आवडले नाहीत आणि त्यामुळे नागा आणि समांथा विभक्त झाले अशा चर्चा आहेत.