१९८० सालामध्ये मिस इंडियाचा किताब पटकावणाऱ्या अभिनेत्री संगीता बिजलानीचा आज वाढदिवस आहे. संगीता आज तिचा ६१वा वाढदिवस साजरा करतेय. हिंदी सिनेसृष्टीत ९०-८० या काळात संगीताने करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मोठी धडपड केली मात्र अभिनयापेक्षा संगीता तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली.

सलमान खानसोबतच्या रिलेशनशीपमुळे संगीता बिजलानी अधिक चर्चेत आली होती. सलमान आणि संगीताचं नातं लग्नापर्यंत पोहचलं होत. मात्र त्यांचं लग्न होवू शकलं नाही. त्यानंतर संगीताच्या आयुष्यात क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनची एण्ट्री झाली. संगीता आणि अजहरुद्दीनची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच फिल्मी आहे. असं असलं तरी १४ वर्षांच्या संसारानंतर संगीता आणि अजहर विभक्त झाले.

अशी झाली होती पहिली भेट
एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांची भेट झाली होती. पहिल्या भेटीत अजहर संगीताच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. अजहर संगीताच्या प्रेमात पडला तेव्हा तो विवाहित होता. अजहरला मात्र संगीताशी लग्न करायचं होतं. आपल्याला संगीताशी लग्न करायचं आहे हे अजहरने त्याची पहिली पत्नी नौरीनला सांगितलं. एका मुलाखतीत अजहरने या गोष्टीचा खुलासा केला होता. नौरीने आणि अजहर विभक्त झाले. त्यानंतर १९९६ साली संगीता आणि अजहरने विवाह केला.

हे देखील वाचा: खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुष्मिता सेनची मुलगी रेनी देते ‘हे’ उत्तर

१४ वर्षांनंतर झाले विभक्त
संगीता बिजलानी आणि मोहम्मद अजहरुद्दीन यांचा संसार १४ वर्ष टिकला. दोघांच्या नात्यात समस्या निर्माण होवू लागल्या. मीडिया रिपोर्टनुसार अजहर आणि बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा यांच्या मैत्रीमुळे संगीताला अडचण निर्माण होवू लागली. अखेर संगीताने अजहरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटानंतर संगीताने दुसरं लग्न केलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संगीता आजही तिचा पहिला बॉयफ्रेण्ड सलमान खानच्या संपर्कात आहे. दोघांमध्ये आजही मैत्री कायम आहे. सलमान खानच्या कौंटुंबिक सोहळ्यांमध्ये अनेकदा संगीताला स्पॉट केलं जातं.