बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे दोघेही सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने सलमान माझ्या लहान भावासारखा आहे, असे वक्तव्य केले होते. संजय दत्त आणि सलमान खान यांच्या मैत्रीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ‘चल मेरे भाई’, ‘साजन’, ‘सपने साजन के’ अशा अनेक चित्रपटात त्या दोघांनी ९० च्या दशकात काम केले आहे. मात्र काही कारणामुळे त्या दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यावर होता. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने ‘संजू’ चित्रपटात तिचे नाव कुठेही वापरले जाऊ नये, अशी अट घातली होती. संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे दोघेही रिलेशनशीपमध्ये होते, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे तिने सलमान खानला संजय दत्तला समज देण्यासाठी पाठवले होते. संजय दत्तने हा चित्रपट करु नये, असा सल्ला सलमानने संजयला दिला होता. मात्र संजयने सलमानचा हा सल्ला नाकारत स्वत:च्या जीवनावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. संजयने हा निर्णय घेतल्यावर सलमानला प्रचंड राग आला. त्यानंतर सलमानने त्याच्याशी बोलणं बंद केलं.

यानंतर काही ना काही कारणामुळे सलमान आणि त्याच्या नात्यातील दरी वाढतच गेली. ‘संजू’ या चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर झळकला होता. यामुळेही सलमान प्रचंड संतापला होता. कारण रणबीर हा सलमानच्या तथाकथित गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर २०११ मध्ये सलमानने संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तच्या वाढदिवसाच्या पार्टीत काही गैरव्यवहार केला होता. संजयचा खास मित्र बंट वालियासोबत सलमानचे जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे संजयला राग आला होता.

दरम्यान त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर सलमान आणि संजय दत्तमधील भांडण कमी झाले. यानंतर ते दोघेही ‘रेडी’, ‘सन ऑफ सरदार’, ‘पोलिसगिरी’ यासारख्या चित्रपटात एकत्र झळकले होते. विशेष बाब म्हणजे येत्या काही दिवसात ते दोघे अनेक चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay dutt and salman khan fight due to co star madhuri dixit know what reason behind nrp
First published on: 20-09-2021 at 20:32 IST