Sanjay Dutt Restaurant : मुंबईत अनेक बॉलीवूड स्टार्सची रेस्टॉरंट्स आहेत. आता या यादीत बॉलीवूडचा खलनायक संजय दत्तही सामील झाला आहे. या अभिनेत्याने काल (२० सप्टेंबर) त्याचे रेस्टॉरंट लाँच केले. त्यानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे संजय त्याच्या पत्नीबरोबर स्टायलिश लूकमध्ये पोहोचला होता. दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
संजय दत्त अभिनेता असण्याबरोबरच आता एक व्यावसायिकही बनला आहे. शनिवारी (२० सप्टेंबर) त्याने मुंबईतील त्याच्या ‘सोलेअर रेस्टॉरंट’ या रेस्टॉरंटसाठी लाँच पार्टी आयोजित केली होती. या भव्य कार्यक्रमात त्याने त्याच्या पत्नीसह ग्रँड एन्ट्री केली. दोघेही अत्यंत स्टायलिश दिसत होते. या जोडप्याने कार्यक्रमात पापाराझींसाठी पोजदेखील दिल्या.
संजय दत्त त्याच्या पत्नीबरोबर स्टायलिश लूकमध्ये
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये संजय दत्तने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डिझायनर लेदर जॅकेट घातल्याचे दिसत आहे. दरम्यान, अभिनेत्याची पत्नी मान्यता दत्त शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि कार्यक्रमात तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मान्यताने ग्लॉसी मेकअप, हील्स आणि मॅचिंग बॅगने तिचा लूक पूर्ण केला. चाहत्यांना या जोडप्याचा रॉयल लूक खूप आवडला आहे आणि ते कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे कौतुक करीत आहेत.
‘रॉकी मेरा नाम’ म्हणत १९८१ मध्ये संजय दत्तने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्याच्या पहिल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. ८० च्या दशकात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये संजय दत्तच्या ‘रॉकी’ सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ८०-९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता म्हणून संजय दत्तला ओळखलं जातं आणि त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.
या चित्रपटात दिसणार संजय दत्त
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, संजय दत्त अलीकडेच ‘बागी ४’ चित्रपटात दिसला. या चित्रपटात टायगर श्रॉफ, हरनाज कौर संधू व सोनम बाजवा यांनी भूमिका केल्या होत्या. या वर्षी संजय दत्तचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यात ‘धुरंधर’ हा चित्रपटदेखील आहे, ज्यामध्ये तो बॉलीवूड स्टार रणवीर सिंहबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.