Sanjay Dutt: संजय दत्तने गांधीगिरीचा मार्ग अवलंबावा- शत्रुघ्न सिन्हा

संजय दत्तची गेल्या गुरूवारी पुण्याच्या येरवाडा कारागृहातून कायमची सुटका झाली.

संजय दत्त, शत्रुघ्न सिन्हा

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी म्हणून शिक्षा भोगून घरी परतलेल्या संजय दत्तचे गेल्या आठवड्यात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रेटींनी जाऊन त्याची भेटही घेतली. तर काही जणांनी सामाजिक माध्यमांवरून त्याचे स्वागत केले. अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील संजूबाबाच्या सुटकेनंतर ट्विटवरून त्याचे स्वागत केले. तसेच, संजय दत्तने २००६ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाप्रमाणे गाधीगिरीचा मार्ग अवलंबावा असा सल्लाही त्यांनी दिला
अभिनेता संजय दत्त याची गुरूवारी पुण्याच्या येरवाडा कारागृहातून कायमची सुटका झाली.  त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट केले की, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातून संजयने गांधीगिरीचा संदेश दिला होता. आता त्याने स्वतः तो मार्ग अवलंबण्याची गरज आहे. संजयच्या सुटकेची वाट पाहणा-या त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठी मला आनंद होतोय. संजय हा आमच्या जवळच्या मित्रमंडळींपैकी एक आहे. त्याच्या सुटकेने मलाही हायसे वाटले.
शत्रुघ्न सिन्हा आणि संजय दत्तने १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘अधर्म’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay dutt should follow gandhigiri shatrughan sinha

ताज्या बातम्या