scorecardresearch

Premium

“विक्रम गोखले साहेबांनी चक्क मला…”; संकर्षण कऱ्हाडेने भावूक होत शेअर केल्या शूटिंगच्या आठवणी, पोस्ट व्हायरल

विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

sankarshan

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेही एका पोस्टच्या माध्यमातून विक्रम गोखले यांच्या आठवणीत भावूक झाला.

संकर्षणने सोशल मीडिया अकाउंटवरून विक्रम गोखले यांच्याबरोबरचे त्याचे शूटिंगदरम्यान काढललेले फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना त्याने लिहिलं, “आणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क मला रंग लावला हो…मी विक्रम गोखले सरांना “गोखले साहेब” असं म्हणतो.. आणि ते कधीच मला संकर्षण म्हणाले नाहीत.. “संक्रमण” म्हणायचे.. खोपा नावाच्या एका सिनेमात ते माझे आजोबा होते.. गुंडांसोबतच्या मारामारीत मला जबर जखम होते.. ती जखम दाखवण्यासाठी केलेला मेकअप त्यांना “खरा वाटत नव्हता..” ते म्हणाले, सगळ्यांना माहिती आहे सिनेमातली जखम खोटीच असते… पण ती “खरी वाटली पाहिजे” आणि त्यांनी स्वत: माझा मेकअप केला हो…आरसा दाखवला….”

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

आणखी वाचा : “काका, तुम्ही खूप काही दिलंत…”; विक्रम गोखले यांच्या आठवणीत श्रेया बुगडे भावूक

पुढे संकर्षणने लिहिलं, “ह्याच सिनेमातली अजुन एक आठवण सांगतो; काही सीन्स त्यांना लिखाणात आवडले नव्हते…म्हणुन मी ते रिराईट केले. तर साहेबांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांना बोलवून सांगीतलं की, “ह्या मुलाला credits मध्ये विशेष सहाय्य म्हणुन नाव द्या अन्यथा त्याचे पैसे द्या…” ही सगळी कित्ती थोर असल्याची लक्षणं आहेत.. कुठलाही कलाकार त्याच्या कला गुणांइतकाच त्याच्या सोबतच्या सिनियर्समुळे घडतो…माझं भविष्यात काही चांगलं झालं तर त्यात गोखले साहेबांचा ही मोठ्ठा वाटा असेल…गोखले साहेब…आठवण येत राहील…”

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

हेही वाचा : Photos: विक्रम गोखलेंच्या निधनाने शोककळा, अंतिम दर्शनावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:25 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×