आपली दमदार गाणी आणि डान्स मूव्हसाठी प्रसिद्ध असलेली हरियाणाची डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. बिग बॉस फेम सपना चौधरी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते आणि आपल्या पोस्टमुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सपना चौधरीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी तिचा पती वीर साहूसोबत रोमांस करताना दिसत आहे. सपना चौधरीचा पती वीर साहू टेरेसवर एकटा उभा असलेला दिसत आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी सपना चौधरीची एंट्री होते. त्यानंतर ती पतीसोबत रोमांस करताना दिसते. मावळतीच्या सूर्यप्रकाशातील सपना- वीर यांचा हा रोमँटिक अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

आणखी वाचा- मलायकाला का वाटत होती आलिया- रणबीरच्या रिसेप्शन पार्टीला जाण्याची भीती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सपना चौधरीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, ‘माय हार्टबीट’ सपनाच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सपना चौधरीनं अशाप्रकारे पतीवर असलेल्या प्रेमाची उघडपणे कबुली देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं पतीच्या नावाचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे.