कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस भीषण होत आहे. दररोज लाखो लोकांना या कोरोना विषाणूची लागण होत आहे. या विषाणूमुळे किती तरी निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांमध्ये भीती वाढत असताना कोरोनाची भीषण परिस्थिती पाहून काही सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता यात अभिनेत्री सारा अली खान हिचं नाव देखील यात जोडलं आहे. अभिनेत्री सारा अली खानने करोना काळात लोकांसाठी मदतीचा हात पुढे करत सोनू सूद फाऊंडेशनला तिने योगदान दिलंय. अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या या मदतीसाठी सोनू सूदने ही तिचं कौतूक केलंय.

अभिनेत्री सारा अली खानने ऑक्सिजन सिलेंडर्स खरेदी करण्यासाठी सोनू सूद फाऊंडेशनला योगदान दिलंय. अभिनेत्री सारा अली खानने दिलेल्या या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी सोनू सूदने नुकतंच एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने सारा अली खानचं कौतूक देखील केलंय.

या ट्विटमध्ये सोनू सूदने लिहिलं, ” प्रिय सारा अली खान, सूद फाऊंडेशनसाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप खूप आभार..तुमचा गर्व वाटतोय आणि असंच पुण्याचं काम करत रहा…अशा कठीण परिस्थितीत पुढाकार घेऊन देशातील युवा पिढीला प्रेरित केलं आहे….तुम्ही हिरो आहात सारा अली खान.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून करोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तसंच करोना रूग्णांसाठी मदत करण्याचे आवाहन देखील तिने केलंय. सोनू आणि साराने यापूर्वी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ मध्ये एकत्र काम केलंय. या सुपरहिट चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता.